आरोग्य अंतिमो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य अंतिमो
आरोग्य अंतिमो

आरोग्य अंतिमो

sakal_logo
By

सात्विक आहार, आरोग्यपूर्ण विहार
----
इंट्रो
कोरोनानंतर जागतिक आरोग्य व्यवस्था उघड्यावर पडली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यातून मानवजातीला एक मोठा धडा मिळाला आहे, हे नक्कीच. विकसित, विसकसनशील आणि अगदी गरीब देशांतील स्थिती कोरोनामुळे सारख्याच पातळीवर असल्याचे निष्पन्न झाल्याचे दिसून आले. मानवाच्या रोगप्रतिकारकशक्तीची परीक्षा या निमित्ताने सर्वांनाच झाली. एकूणच खाण्या-पिण्याच्या सवयी, शिस्तबद्ध जीवनशैली अशा अनेक बाबींची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली. भारतीय जीवनमानाचे, एकत्र कुटुंबपद्धतीचे, सांस्कृतिक वारशाचे महत्त्वही अधोरेखित झाले. आरोग्यसंपन्न जीवनशैलीसाठी आयुर्वेदाने सांगितलेली आहार-विहाराची पद्धती, भारतीयांची चौरस आहार फायदेशीर असल्याचेही दिसून आले.

इंटेक्चुअल

आरोग्य व्यवस्था सक्षम कधी होणार?
सध्या आपल्या देशाची लोकसंख्या सुमारे १३६ कोटींवर पोहोचली आहे. अशा अफाट लोकसंख्येच्या देशातील आरोग्य व्यवस्था पुरेशी आहे का? उपलब्ध साधनसामग्री आणि डॉक्टरांची संख्या पाहता देशाच्या लोकसंख्येपुढे ती तोकडीच आहे. दुसरीकडे देशात दरवर्षी आरोग्यव्यवस्थेवर केला जाणारा खर्च हा नगण्यच म्हणावा लागेल. त्यामुळे उपलब्ध निधीमध्ये आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याची अपेक्षा कशी करणार? जागतिक आरोग्य संघटनेने दर एक हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर, असे प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार भारतात किमान एक कोटी ३४ लाख डॉक्टरांची गरज आहे; मात्र २०१७ पर्यंत देशात अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांची संख्या १० लाख ४१ हजार ३९५, तर आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी आणि अन्य डॉक्टरांची संख्या जेमतेम आठ लाखांपर्यंत होती. विशेष म्हणजे देशातील एकूण अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांपैकी केवळ एक टक्का म्हणजेच लाखभर डॉक्टर सार्वजनिक वैद्यकीय सेवेत आहेत. शिवाय यामध्ये दंत आरोग्य गृहीत धरलेले नाहीच. शहरी भागातील अपवाद वगळता ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्षच होते. त्यामुळे आपली आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम कधी होणार, हा प्रश्नच आहे.
देशातील सुमारे ८० टक्के वैद्यकीय सेवेवर खासगी क्षेत्राची मक्तेदारी आहे. म्हणजेच सार्वजनिक सेवा किती दुबळी आहे, हेही यानिमित्ताने दिसून येते; मात्र कोरोनासारख्या संकटकाळात सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आणि सक्षमपणे कार्यस्थ झाली, हे नाकारून चालणार नाही. या काळात सरकारी वैद्यकीय सेवेचा वाटा मोठा होता, हे मान्यच करावे लागेल; पण तरीही तिचे मूळ दुखणे काही कमी झालेले नाही. शासकीय पातळीवर किमान वैद्यकीय सुविधा उपलब्धच होत नाहीत किंवा त्या तेवढ्या सक्षम नसल्याने रुग्णांना खासगी वैद्यकीय सेवेचा आधार घ्यावा लागतो. यामुळे स्वाभाविकच सरकारी व्यवस्थेतील कमतरता अधोरेखित होते. ही झाली वैद्यकीय सेवेची देशभरातील स्थिती; मात्र आरोग्याच्या बाबतीत देशाने काही क्षेत्रांमध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे.

----
फिजिकल
देशाने गेल्या काही वर्षात जन्म-मृत्यू दराच्या बाबतीत प्रगती केली आहे. १९९१ मध्ये दरहजारी जन्मदर २९.५ होता. तो २०२१ मध्ये १७.३७ पर्यंत कमी झाला आहे. मृत्युदरातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अर्भक मृत्युदरही कमी झाला आहे. नागरिकांचे आयुष्यमान वाढले आहे. देशातून काही जुने रोग गेले असले, तरी त्यांची जागा नव्या रोगांनी घेतली आहे. स्वाईन फ्लू, चिकन गुनिया, डेंगी आदी विषाणूजन्य रोगांनी डोके वर काढले आहेत. याशिवाय परदेशी जीवनशैलीचे अनुकरण करण्याच्या नादात आणखी काही नवे आजार ओढवून घेतले आहेत. त्याचे दुष्परिणामही आता वेगाने दिसत आहेत. हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह, किडनी, श्वसनासंबंधीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यासाठी कारणीभूत असलेल्या विविध कारणांचा वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास सुरू आहे. या आजारांवर विविध अत्याधुनिक उपचार उपलब्ध असले, तरी या आजारांच्या रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. शिवाय या आजारांचे वयोमानही कमी कमी होत चालले आहे. अगदी तरुणांमध्ये हृदयरोग आणि मधुमेहासारखे आजार दिसत आहेत. याकरिता काही वनरुपी क्लिनिकसारखे प्रयोग मुंबईसारख्या महानगरांत केले गेले. जिथे सामान्यातील सामान्याला स्वस्त उपचार उपलब्ध झाले. त्याचबरोबर काही नवे स्टार्टअपही आले. ‘एफआयटीटीआर’सारखे स्टार्टअप फिटनेसमधील नव्या करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या. यातून लोकांनी स्वतः शिकून त्यातून स्वतःला आणि जीवनशैलीत बदल घडवून आणले. जीवनशैलीतून लोक पुन्हा एकदा भारतीयत्वाकडे वळले. रोज योग्य आहार आणि सुयोग्य विहार या मार्गावरून चालू लागले.
---
इमोशनल
आयुर्वेदाच्या वाटेवर
१९९१ पासून म्हणजे आर्थिक उदारीकरणानंतर भारताने आर्थिक आघाडीवर चांगली प्रगती केली; मात्र तरीही देशाला कुपोषण आणि बालमृत्यू आटोक्यात आणता आलेले नाहीत. काही राज्यांत मेंदूज्वराचे रुग्ण अजून सापडतात. बालमृत्यूबाबत केरळची कामगिरी उल्लेखनीय आहे. केरळचे आरोग्य, जीवनमान व आयुर्मान सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यांनी सर्वाधिक आयुर्वेदाचा अंगीकार केला आहे. केरळमध्ये अनेक सरकारी दवाखान्यांमध्ये आयुर्वेदिक ओपीडी सुरू केल्या आहेत. देशात सर्वाधिक आयुर्वेदिक ओपीडी केरळमध्ये सुरू आहेत. त्याला तेथील लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोकांना याद्वारे जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. त्याच परिणामस्वरूप केरळची आरोग्यस्थिती उंचावलेली दिसते.
..........

आध्यात्मिक
आयुर्वेदाने मानवी जीवनाचा सारासार विचार केला होता. आयुर्वेदानुसार आरोग्य संपन्न जगण्यात मुळात माणूस आजारी पडणारच नाही, अशी अपेक्षा होती. आयुर्वेद शास्त्राचे प्रयोजनच मुळी ‘स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च’ हे आहे. म्हणजे निरोगी व्यक्तीच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि एवढे करूनही जर रोग झालाच, तर त्यावर उपचार करणे, असे आयुर्वेद म्हणते. यामध्ये निरोगी व्यक्तीचे आरोग्य टिकवून ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे रोगावर उपचार ही बाब दुय्यम मानली गेली आहे. चरक संहिता हा आयुर्वेद शास्त्रातला महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. या संहितेचा प्रारंभच मुळी ‘दीर्घन्जीवितीया’ म्हणजे दीर्घकाळ जगण्यासाठी करावयाच्या बाबींची माहिती देण्याच्या अध्यायापासून झाला आहे. म्हणजेच आरोग्यसंपन्न दीर्घायुष्यावर आयुर्वेदाचा भर होता; मग आरोग्य म्हणजे नेमके काय, असा प्रश्न पडतो; परंतु आयुर्वेदात यावरही योग्य असे मार्गदर्शन केलेले आहे.
शरीराला धारण करणारे तीन दोष (वात, पित्त, कफ), सात धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र), तीन मल (मूत्र, स्वेद, पुरीष) आणि अग्नी, पचनशक्ती हे १४ घटक यांचे कार्य प्राकृत असणे, इंद्रिये (ज्ञानेन्द्रीये, कर्मेंद्रिये) आणि त्याचबरोबर मन, आत्मा प्रसन्न असणे हे स्वस्थ अर्थात निरोगी माणसाचे लक्षण, असे आयुर्वेदाने सांगितले आहे. त्यामुळेच निरोगी माणसाचे मन नेहमी प्रसन्न राहते. या प्रसन्नतेतून अनेक बाबींना गती मिळते. त्यामुळेच आरोग्यसंपन्न तरुण पिढी देश घडवू शकते, त्याचा प्रगतीचा वेग वाढवू शकते आणि तीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे. आयुर्वेदाबरोबरच होमिओपॅथिक, युनानी याही शाखा आता प्रगती करीत आहेत.
.............

भौतिक
भारतीय जीवन संस्कृतीचा अधिक गांभीर्याने विचार करण्याची ही योग्य वेळ आहे. त्यातील जीवनमूल्ये, राहणीमान, खाद्यसंस्कृती ही आरोग्यपूर्ण असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. प्राचीन काळातील खाद्यसवयी, जीवनपद्धती, निसर्ग सुसंगत जीवनमान हेच फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. त्या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी आयुर्वेदिक, निसर्गोपचार, योगसाधना केंद्रांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे शहरी भागातील अनेकांचा या उपचारपद्धतीकडे कल वाढत आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी हिरवीगार उद्याने, मैदाने, मोकळ्या जागा, जॉगिंग ट्रॅक, क्रीडा संकुलांची संस्कृती वाढीस लावावी लागेल. नव्या शहरांमध्ये अशा प्रकारची सुविधा केंद्रे उभारावी लागतील. लोकांच्या जीवनशैलीशी निगडित अनेक बदल भौतिक रचनेत करावे लागतील. स्वच्छ हवा आणि पाणी आरोग्यरचनेचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यादृष्टीनेही शहरांमध्ये बदल करावे लागतील.
............

आरोग्यपूर्ण शैलीच्या माहितीसाठी ईसकाळला भेट द्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92902 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..