रेल्वेत आता कैद्यांमार्फत तयार केलेल्या बेडशीट्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेत आता कैद्यांमार्फत तयार केलेल्या बेडशीट्स
रेल्वेत आता कैद्यांमार्फत तयार केलेल्या बेडशीट्स

रेल्वेत आता कैद्यांमार्फत तयार केलेल्या बेडशीट्स

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः मध्य रेल्वेने येरवडा कारागृहातील कैद्यांमार्फत तयार केलेल्या चादरी खरेदी करून मेल-एक्स्प्रेस गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना मोठा रोजगार निर्माण होणार आहे. तसेच रेल्वेच्या पैशांची मोठी बचत होणार आहे. या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात १५ ऑगस्ट २०२२ पासून सीएसएमटी-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसपासून करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.

देशभरातील भारतीय रेल्वेच्या लांब पल्ल्याचा गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लिनेन (बेडरोल) सुविधा दिली जाते. या सुविधांमध्ये रेल्वेचा मोठा खर्च होतो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बेडरोल आणि ब्लँकेटची सुविधा बंद करण्यात आली होती. मार्च २०२२ रोजी रेल्वे महामंडळाने लिनेन (बेडरोल) बंदी हटवण्यात आली आहे. तरीसुद्धा पूर्ण क्षमतेने बेडरोल पुरवण्यात येत नाहीत. प्रवाशांना पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून तयारी करण्यात आली होती. त्यानुसार येरवडा कारागृहातील कैद्यांमार्फत तयार केलेल्या चादरी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेने खरेदी केल्या ८९ चादरी
येरवडा कारागृहातील शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून तयार करण्यात येत असलेल्या चादरीच्या गुणवत्तेचा दर्जा चागला असल्याने मध्य रेल्वेने येरवडा कारागृह प्रशासनाकडून ८९ चादरी खरेदी केल्या आहेत. आता या चादरी १५ ऑगस्ट २०२२ रोजी सीएसएमटी-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या एका वातानुकूलित डब्यात प्रवाशांना वितरित करण्यात येणार आहेत.
...
प्रवाशांचे करणार सर्व्हेक्षण-
कैद्यांकडून हाताने तयार करण्यात आलेल्या चादरीची माहिती सर्वप्रथम प्रवाशांना देण्यात येईल. प्रवाशांना ऐच्छिक स्वरूपात ही सुविधा देण्यात येणार आहे. प्रथमच आम्ही राजधानी एक्स्प्रेसच्या एका डब्यात ८९ चादरी वितरित करणार आहोत. त्यानंतर प्रवाशांना कैद्यांकडून तयार करण्यात आलेल्या चादरी कशा वाटल्या, त्यासंदर्भातील सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतरच कारागृहात तयार झालेल्या चादरींची संख्या वाढवू, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

कोट-
कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या कौशल्याला रोजगार मिळावा, या हेतूने मध्य रेल्वेने आणि येरवडा कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही कैद्यांनी तयार केलेल्या चादरी राजधानी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना देणार आहोत. सध्या आम्ही ८९ चादरी खरेदी केल्या आहेत.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92903 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..