अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : नागरिकांना फूटपाथवर चालणे सुकर व्हावे म्हणून मुंबई महानगरपालिका काही भागात पथदर्शी प्रकल्प राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून आता फेरीवालामुक्त फूटपाथसाठी पालिका पुढाकार घेत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत फेरीवाल्यांवर तीव्र कारवाई केली जाणार आहे. यासाठी आता अशासकीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे. खासगी संस्थांच्या मदतीने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
महापालिकेच्या सी विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी खासगी संस्थांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ते, फूटपाथ अडवून बसणारे अनधिकृत फेरीवाले आता पालिकेच्या रडारवर आले आहेत.

मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. मोक्याच्या जागांवरील फूटपाथ, चौक, रस्ते फेरीवाल्यांनी व्यापल्याने नागरिकांना कसरत करून चालावे लागत आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या माध्यमातून कारवाई केली जाते; परंतु अनेक वेळा कारवाईसाठी मनुष्यबळ अपुरे पडते. त्यामुळे खासगी संस्थांच्या मदतीने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा आराखडा पालिका प्रशासनाने तयार केला आहे. पालिकेच्या सी विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी खासगी संस्थांनी मनुष्यबळ पुरवावे, यासाठी खासगी संस्थांना आवाहन केले आहे.
पालिकेच्या अटी-शर्तींनुसार संस्थांनी स्वयंसेवकाचा पुरवठा करणे बंधनकारक आहे, असे सी विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, अटी-शर्तीचे पालन न करणे अथवा समाधानकारक काम करत नसल्यास संबंधित संस्थेचे काम सी - विभागाचे सहायक आयुक्त थांबवू शकतात. ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान अतिक्रमण निर्मूलन वाहनांवर ४ कंत्राटी कामगारांची नेमणूक केली जाणार आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

चौकट
कारवाईसाठी खासगी संस्थेची निवड
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी खासगी संस्थेची निवड करण्यात येणार आहे. पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कारवाईत साप्ताहिक सुट्टी व सार्वजनिक सुट्टी वगळता स्वयंसेवक पुरवणे ही संस्थेची जबाबदारी असणार असून नियुक्ती केल्यापासून पुढील तीन महिने कारवाईची मोहीम राबवली जाईल, असे अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92910 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..