पोलिसांची सुरक्षा यंत्रणा सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांची सुरक्षा यंत्रणा सज्ज
पोलिसांची सुरक्षा यंत्रणा सज्ज

पोलिसांची सुरक्षा यंत्रणा सज्ज

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : सोमवारी १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून मुंबईत ड्रोनविरोधी यंत्रणांसह पोलिसांच्या राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला.
स्थानिक पोलिस, विशेष शाखा आणि गुन्हे शाखेचे कर्मचारी, बॉम्बशोधक पथक आणि श्वानपथक महत्त्वाच्या स्थळांवर तैनात करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम होणार आहेत त्या ठिकाणी ड्रोनविरोधी यंत्रणा बसवण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ११ ऑगस्ट बुधवारपासून ‘ऑपरेशन ऑल आऊट’ सुरू केले आहे. या मोहिमेंतर्गत मुंबईतील हॉटेल, संशयित स्थळांची तपासणी, पोलिस गस्त वाढवणे, महत्त्वाच्या रस्त्यांवर रोड बॅरिकेडिंग करून वाहने तपासणी केली जात आहेत. समाजकंटकांवर कारवाई केली जात आहे. पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
...
‘ऑपरेशन रीयुनायटेड’ची सुरुवात
बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची ‘ऑपरेशन रीयुनायटेड’ ही मोहीम स्वातंत्र्यदिनी सुरू होणार आहे. बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेणारी ही विशेष मोहीम १५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92911 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..