स्पंदन फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पंदन फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
स्पंदन फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

स्पंदन फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १४ (बातमीदार) ः स्पंदन फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेतील ८०० विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके आदी शालोपयोगी साहित्यवाटप करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून हा उपक्रम राबवण्यात आला. ग्रामीण भागातील मुलांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी गेली काही वर्षे स्पंदन फाऊंडेशन कार्यरत आहे.

अंबरनाथचे नेत्रतज्ज्ञ डॉ. राहुल चौधरी आणि त्यांचे सहकारी स्पंदन फाऊंडेशनच्या वतीने मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागातील १४ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे म्हणून कार्यरत आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, म्हणून ‘स्पंदन’ विविध उपक्रम राबवत असते. शाळांमध्ये स्वच्छतागृह, हात धुण्याचे स्टॅन्ड, क्रीडा साहित्य गरजेनुसार उपलब्ध करून दिले जाते. याव्यतिरिक्त या १४ शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दर वर्षी दप्तर, शालेय साहित्य, वह्या आणि पुस्तके फाऊंडेशन, रोटरी तसेच इतर संस्थांच्या मदतीने देण्यात येतात. यंदा शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ‘स्पंदन’ने दत्तक घेतलेल्या सर्व १४ शाळांची डागडुजी आणि रंगरंगोटी केली. त्यानंतर स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मुरबाड तालुक्यातील म्हसा, कान्होळ, पाटगांव, चिरड, जांभूळवाडी, बाटलीची वाडी, पादीरवाडी, वाघाची वाडी, कामतवाडी, चाफेवाडी, गेटवाडी, तागवाडी, शिळंद, शिळंदवाडी, खोकाटेवाडी, रावगांव येथील शाळांमध्ये शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे अध्यक्ष आनंद राणे, डॉ. कुणाल चौधरी, स्पंदन फाऊंडेशनचे डॉ. राहुल चौधरी आदी याप्रसंगी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92920 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..