बोर्डीत वीज वाहिन्यांची दुरावस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोर्डीत वीज वाहिन्यांची दुरावस्था
बोर्डीत वीज वाहिन्यांची दुरावस्था

बोर्डीत वीज वाहिन्यांची दुरावस्था

sakal_logo
By

बोर्डी, ता. १६ (बातमीदार) : बोर्डी गावातील विजयस्तंभ बाल क्रीडांगण या मुख्य रस्त्यावरील वीजवाहिनी आणि ट्रान्स्फॉर्मरची दुरवस्था झाली असून एखादी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे वीजवाहिनी आणि ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करावी. तसेच वीजवाहन्यांना अडथळा करणाऱ्या झाडांची छाटणी करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. बोर्डी गावाच्या हद्दीत रस्त्यालगत सुमारे तीन किलोमीटर अंतरात पन्नास वर्षांपूर्वी उच्च दाबाच्या वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांचे खांब जीर्ण झाले आहेत; तर वीजवाहिन्या जमिनीकडे लोंबकळत आहेत. याच भागात आठवडे बाजार भरत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे; तर बाळ क्रीडांगण व विजयस्तंभ असल्याने या ठिकाणी लहान मुलांची मोठी वर्दळ असते, यामुळे वीजवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92950 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..