अपघातातील मृत गाईवर अंत्यसंस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातातील मृत गाईवर अंत्यसंस्कार
अपघातातील मृत गाईवर अंत्यसंस्कार

अपघातातील मृत गाईवर अंत्यसंस्कार

sakal_logo
By

कासा, ता. १७ (बातमीदार) : चारोटी ते डहाणू रस्त्यावर कांदोळपाडा येथे शनिवारी (ता. १३) अज्ञात वाहनाच्या धडकेत एका गायीचा मृत्यू झाला होता. डहाणू येथील राष्ट्रीय हिंदू सेवा संघाचे जिल्हा प्रभारी मालू भरवाड हे रस्त्यावरून जात असताना त्यांनी आपले वाहन थांबवून परिस्थितीचा आढावा घेतला. गाय मृत झाल्याने तिच्यावर अंत्यसंस्कार करणे गरजेचे होते. त्यांनी जेसीबीच्या मदतीने परिसरात खड्डा खोदून त्यात गाईवर विधिवत अंत्यसंस्कार केले. या वेळी डहाणू विभाग अध्यक्ष गौरव ठाकूर, प्रवीण व्यास, जतिन गुप्ता सहभागी झाले होते.

अनेक दिवसांपासून चारोटी ते डहाणू रस्त्यावर मोकाट गुरांचे कळप रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होत आहे. अपघातात वाहनचालक जखमी झाले आहेत, पण अनेक गुरांचा मृत्यू ओढवला आहे. यावर अजूनपर्यंत कोणताही उपाय काढला जात नाही. नेहमीच होणाऱ्या या मोकाट गुरांच्या अपघातांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले जात आहेत; पण अजून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. यामुळे चालकांनी सावधानता बाळगून आपली वाहने चालवावी, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93036 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..