१०२ वर्षांपासून असलेले कामोठ्याचे शिवमंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१०२ वर्षांपासून असलेले 
कामोठ्याचे शिवमंदिर
१०२ वर्षांपासून असलेले कामोठ्याचे शिवमंदिर

१०२ वर्षांपासून असलेले कामोठ्याचे शिवमंदिर

sakal_logo
By

हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. या महिन्यात श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा महत्त्वाची मानली जाते. कामोठे गावात १०२ वर्षांपासून असलेले शिवमंदिर कामोठे वसाहतीबरोबरच आजूबाजूच्या वसाहतीमधील नागरिकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
----------------------------
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील इतर वसाहतींपेक्षा कामोठ्याचे शहरीकरण झपाट्याने झाले आहे. पूर्वेला न्हावा शेवा बंदर रोड पश्चिम बाजूला कांदळवन दक्षिणेला हार्बर रेल्वे लाईन; तर उत्तरेला सायन-पनवेल महामार्गावर अशा चौकटीत बसलेल्या कामोठा वसाहतीच्या मधोमध कामोठे गाव आहे. शहरीकरणामुळे एक इंचही जमीन शिल्लक न राहिलेल्या कामोठ्यातील शिवमंदिर अर्धा एकर जागेवर वसले आहे. या मंदिराच्या समोर विस्तीर्ण तळे आहे. या तळ्यात बारमाही पाणी असते. जवळपास शंभर वर्षांपूर्वी या ठिकाणी छोटे शिवमंदिर होते. त्याची पूजाअर्चा कामोठे येथील स्थानिक नागरिक अनंत म्हात्रे हे करत होते. कामोठ्याचे शहरीकरण होऊ लागल्यानंतर १३ वर्षांपूर्वी गावातील नागरिकांनी मिळून या मंदिराचा जीर्णोधार केला. मंदिराच्या दर्शनी भागावर पायऱ्या चढून पहिल्या मजल्यावर जावे लागते. वर गेल्यानंतर समोर सुंदर सुबक अशी नंदीची मूर्ती आहे. पुढे विस्तीर्ण सभामंडप असून हे मंदिर हवेशीर आहे. या ठिकाणी पूर्वी असलेल्या लहान शिवलिंगाचे विसर्जन करून जीर्णोधाराच्या वेळी सुबक शिवलिंगाची विधिवत स्थापना करण्यात आली आहे. तळमजल्यापासून पाच ते सहा फूट उंच व पहिल्या मजल्यापासून पाच ते सहा फूट खोल, अशी शिवलिंगाच्या गाभाऱ्याची रचना आहे.
---------------------------------
धकाधकीच्या जीवनात विरंगुळाचे ठिकाण
सुमरे आर्धा एकर जागेवर हे मंदिर असून महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठा उत्सव भरतो. पहिल्या माळ्यावरील नंदीच्या पाठीमागून संपूर्ण तळ्याचे दर्शन होते. गजबजलेल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये जागोजागी बैठक व्यवस्था आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवण्यात आला असल्याने धकाधकीच्या जीवनात विरंगुळा म्हणून शांतनिवांत वेळ घालवायचा असेल, तर कामोठे येथील शिवमंदिर चांगला पर्याय आहे.
--------------------------------------
- वसंत जाधव, नवीन पनवेल

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93145 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..