उल्हासनगरात आता समस्या निवारणासाठी लोकसेवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात आता समस्या निवारणासाठी लोकसेवक
उल्हासनगरात आता समस्या निवारणासाठी लोकसेवक

उल्हासनगरात आता समस्या निवारणासाठी लोकसेवक

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : कोविडच्या काळात दररोज हजारो गोरगरीब नागरिकांच्या पोटाची भूक भागवणारे उल्हासनगरातील गंगोत्री वेल्‍फेअर फाऊंडेशनचे संस्थापक भारत गंगोत्री, अध्यक्ष सोनिया धामी यांनी स्वातंत्र्यदिनी ‘आम्ही लोकसेवक’ या उपक्रमाची घोषणा केली आहे.
नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात आल्यावर पुढील सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत महानगरपालिका बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळेच आपले दैनंदिन प्रश्न, समस्या सोडवताना नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांच्या समस्या लोकसेवकांच्या मदतीने पालिका प्रशासक आयुक्त अजीज शेख यांच्‍यामार्फत सोडवता येण्यासाठी समांतर यंत्रणा असावी, हा ‘आम्ही लोकसेवक’ उपक्रमामागचा उद्देश असल्याचे भारत गंगोत्री, सोनिया धामी यांनी सांगितले.
संपूर्ण शहरात भागाभागांत मनपा प्रभागनिहाय लोकसेवक कार्यरत राहतील. पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, रस्त्यावरील दिवाबत्ती, खड्डे याबाबतच्या तक्रारींचा लोकसेवक प्राधान्याने पाठपुरावा करतील. त्याशिवाय, बागबगिच्यांची देखभाल व स्वच्छता, मनपा व खासगी शाळा, दवाखाने, लसीकरण, करभरणा, रस्तेदुरुस्ती, सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे, सार्वजनिक शौचालये, समाजमंदिरे आदींबाबत लोकसेवक लक्ष ठेवून राहतील व महापालिकेशी पत्रव्यवहार करतील. गंगोत्री वेल्फेअर फाऊंडेशन लोकसेवकांना प्रशासकीय कामात पाठबळ देईल. हे फाऊंडेशन राजकारणविरहित असणार असल्याची माहिती भारत गंगोत्री, सोनिया धामी यांनी दिली. या वेळी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अमर हिरा, खजिनदार सुनील टेकचंदानी, सदस्य विशाल माखिजा, सुनीता बगाडे, अनिल धामेजानी, माधव बगाडे, राज असरोंडकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93147 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..