गुंडे-डेहणे ग्रामपंचायत नूतन कार्यालयाचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुंडे-डेहणे  ग्रामपंचायत नूतन कार्यालयाचे लोकार्पण
गुंडे-डेहणे ग्रामपंचायत नूतन कार्यालयाचे लोकार्पण

गुंडे-डेहणे ग्रामपंचायत नूतन कार्यालयाचे लोकार्पण

sakal_logo
By

किन्हवली, ता. १६ (बातमीदार) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद डोळखांब गटातील गुंडे-डेहणे ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. भौगोलिक दृष्ट्या क्षेत्रफळाने शहापूर तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या गुंडे-डेहणे ग्रामपंचायच्या नूतन इमारतीचे लोकार्पण १५ ऑगस्‍ट रोजी शहापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे, जिल्हा परिषद सदस्या संगीता गांगड, काशिनाथ पष्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी शहापूर पंचायत समिती सदस्या दीपिका खैर, निमंत्रित जिल्हा परिषद सदस्य चिंतामण वेखंडे, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी आर. बी. भोसले, तालुका कृषी अधिकारी व्ही. टी. घुले, प्रशासक दिलीप बाविस्कर, ग्रामविकास अधिकारी अनिल पाटील, ज्‍येष्ठ नेते शिवाजी देशमुख, सरपंच राहीबाई धुपारी, माजी उपसरपंच आशा तिवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93148 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..