खारघरमध्ये राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमध्ये राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी
खारघरमध्ये राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

खारघरमध्ये राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

sakal_logo
By

खारघर, ता. १६ (बातमीदार) : पनवेल महानगरपालिकेचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपत असल्याने लवकरच नव्याने निवडणुका होणार आहेत. अशातच २०१७ च्या प्रभागरचनेप्रमाणे पालिका निवडणूक घेण्याचा सरकारने निर्णय घेतल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे; तर भाजप कार्यकर्ते मात्र जोमाने कामाला लागल्याचे चित्र खारघरमध्ये आहे.
२०१७ मध्ये झालेल्या पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवला होता. या निवडणुकीत खारघरमधून १२ नगरसेवक निवडून गेले होते. अशातच आघाडी सरकारने प्रभागरचनेत बदल करून एका प्रभागात तीन नगरसेवक असे बद्दल केल्यामुळे खारघरमधून १८ नगरेसवक निवडले जाणार होते. त्यानुसार खारघरमध्ये शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना आणि कॉलनी फोरमकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे; तर भाजपकडून मैदान, उद्यान विकसित उद्‍घाटनांचा सपाटा लावण्यात आला आहे. तसेच खारघरमधून सर्वांत जास्त नगरसेवक पालिकेत जात असल्यामुळे भाजपने प्रभागनिहाय कमिटीची स्थापना करत विविध उपक्रम करत आहेत.

भाजपविरोधात आघाडीची चर्चा
शिवसेना पक्षात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडल्यामुळे खारघरमधील काही कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजप किंवा शिंदे गटात दाखल होतील अशी चर्चा आहे; तर
दुसरीकडे भाजपला आव्हान देण्यासाठी शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना आणि कॉलनी फोरम एकत्र येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
---
भाजपकडून जनसेवेचे काम करीत आहे. तसेच नगरसेवकांनीदेखील पाच वर्षांत सिडको आणि पालिकेच्या माध्यमातून विकास कामे केली आहेत. त्यामुळे २०१७ आणि २०२२ च्या कोणत्याही प्रभागरचनेनुसार निवडणूक झाली तरी आम्ही तयार आहे.
- ब्रिजेश पटेल, शहर अध्यक्ष, भाजप- खारघर

महाविकास आघाडीने तीन नगरसेवकांसाठी एक प्रभाग यानुसार धोरण ठरवले होते. त्यानुसार तयारी सुरू केली होती; मात्र नव्या सरकारने २०१७ नुसार प्रभागरचना निवडणुका घेण्यासाठी इच्छुक असल्याचे समजले. त्यामुळे पुन्हा नव्याने तयारी करावी लागणार आहे. ही निवडणूक आम्ही आघाडी मिळून लढवण्याचा संकल्प केला आहे.
- डॉ. स्वप्नील पवार, जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस, पनवेल

महाविकास आघाडीने योग्य प्रकारे प्रभागरचना केली होती. त्यानुसार निवडणूक विभागाने तयारीदेखील केली होती; मात्र भाजपने २०१७ च्या प्रभागरचनेनुसार निवडणूक घेणार असल्यामुळे पुन्हा सर्वांना नव्याने काम करावे लागणार आहे.
- दत्ता दळवी, उपविभागप्रमुख, शिवसेना, खारघर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93157 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..