मराठी माणसाने रक्त आणि अश्रू सांडून संयुक्त महाराष्ट्र निर्माण केले ः प्रा. डॉ. उदय निरगुडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी माणसाने रक्त आणि अश्रू सांडून संयुक्त महाराष्ट्र निर्माण केले ः प्रा. डॉ. उदय निरगुडकर
मराठी माणसाने रक्त आणि अश्रू सांडून संयुक्त महाराष्ट्र निर्माण केले ः प्रा. डॉ. उदय निरगुडकर

मराठी माणसाने रक्त आणि अश्रू सांडून संयुक्त महाराष्ट्र निर्माण केले ः प्रा. डॉ. उदय निरगुडकर

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १६ (बातमीदार) ः मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे यासाठी स्वाभिमान आणि अस्मितेचा प्रखर असा संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला गेला, त्यासाठी मराठी माणसाचे अश्रू आणि रक्त सांडले गेले. त्यातूनच निर्माण झालेली संयुक्त महाराष्ट्राची सुंदर फुले आजच्या पिढीला वेचता आली. ते भाग्य आपल्याला आचार्य अत्रे आणि त्यांच्यासमवेत असलेल्या समकालीन नेतृत्वाच्या त्यागातून आणि संघर्षातून मिळाले आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. आचार्य अत्रे स्मारक समिती आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई च्या वतीने आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त वरळी नाका येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी आचार्य अत्रे समितीच्या अध्यक्षा ॲड. आरती सदावर्ते-पुरंदरे, नगरसेवक अरविंद भोसले, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, कुटुंब रंगलंय काव्यातचे प्रा. विसुभाऊ बापट आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93166 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..