गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी दुकानदाराला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी दुकानदाराला मारहाण
गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी दुकानदाराला मारहाण

गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी दुकानदाराला मारहाण

sakal_logo
By

मनोर, ता. १६ (बातमीदार) : बोईसर शहरातील दांडी पाड्यात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी वर्गणीच्या नावाने मागितलेले पैसे न दिल्याने सायकल दुरुस्ती करणाऱ्या दुकानदाराला मारहाण केल्याप्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनु यादव, रोहित यादव, जुनेद शेख आणि त्यांच्या सात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
बोईसरच्या दांडी पाड्यात एका गरीब कुटुंबातील व्यक्ती सायकलदुरुस्तीचे दुकान भाड्याने घेतलेल्या गाळ्यात चालवत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी एका खासगी कंपनीतदेखील ते काम करतात. काही दिवसांपूर्वी सात जणांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची वर्गणीची ५०० रुपयांच्या रकमेची पावती त्याला दिली. माझी आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने पन्नास रुपये वर्गणी देणार असल्याचे वर्गणी गोळा करण्यासाठी आलेल्या तरुणांना त्यांनी सांगितले. वर्गणीस नकार दिल्याचा राग आल्याने तरुणांनी दुकानदाराला शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93168 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..