शहापुरात ७५ फूट लांबीचा तिरंगा लक्षवेधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापुरात ७५ फूट लांबीचा तिरंगा लक्षवेधी
शहापुरात ७५ फूट लांबीचा तिरंगा लक्षवेधी

शहापुरात ७५ फूट लांबीचा तिरंगा लक्षवेधी

sakal_logo
By

शहापूर, ता. १६ (बातमीदार) : शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्या हस्ते तहसील कार्यालयासमोर ध्वजवंदन करण्यात आले. विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार अशा ७५ जणांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर शहापूर तहसील कार्यालयापासून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यामध्ये शहापुरातील खाडे विद्यालय, जनकल्याण विद्यालय, पी. एस. देशमुख स्कूल, अर्चना स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, तसेच नागरिक सहभागी झाले होते. या रॅलीत ७५ फूट लांबीचा तिरंगा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. ढोल-ताशांच्या गजरात, विद्यार्थ्यांच्या झांज व लेझीमच्या निनादात जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य रॅली काढण्यात आली. या वेळी आमदार दौलत दरोडा, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक राजेंद्र लोंढे, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93178 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..