भक्तांचे श्रद्धास्थान कळवा (पूर्व) आनंदनगरमधील शिवमंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भक्तांचे श्रद्धास्थान कळवा (पूर्व) आनंदनगरमधील शिवमंदिर
भक्तांचे श्रद्धास्थान कळवा (पूर्व) आनंदनगरमधील शिवमंदिर

भक्तांचे श्रद्धास्थान कळवा (पूर्व) आनंदनगरमधील शिवमंदिर

sakal_logo
By

सोमवारी व शिवरात्रीला भक्तांनी गजबजलेले कळवा परिसरातील एकमेव शिवमंदिर म्हणजे कळवा पूर्वेला असलेल्या आनंदनगरमधील शंकर मंदिर. हे मंदिर कळवा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला १० मिनिटे अंतरावर असलेले प्रसिद्ध मंदिर आहे. आनंद परिसरातील भक्तांना शिवलिंगावर बेलपत्र व अभिषेक करण्यासाठी अन्यत्र जावे लागत असल्याने १९७१ च्या सुमारास आनंदनगर येथील ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक महादूशेठ (भोला) ठाकूर यांनी शंकर मंदिराला जागा देऊन येथे सुंदर कलाकृतीने सजावट करून शंकराचे हे मंदिर बांधले आहे. हे प्रशस्त असे मंदिर असून मंदिराच्या कळसावर ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींच्या मूर्ती साकारल्या आहेत. मंदिराच्या आत‍ये मध्यभागी भगवान शिवशंकराचे लिंग असून भक्तांच्या सोयीसाठी मंदिरातच दत्त, गणेश, विठ्ठल-रखुमाई, प्रभू रामचंद्र-सीता, हनुमान, समर्थ रामदास स्वामी यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. गेल्या काही वर्षांपासून रोज मंदिरात हरिपाठ होतो. दर सोमवारी शिवभक्त येथे दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिरात रामनवमी व हनुमान जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. शिवभक्त दर्शनाला गर्दी करीत असल्याने मुकुंद कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत रांगा लागतात. मंदिरात दरवर्षी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार सहभागी होतात. या कार्यक्रमासाठी येथील माजी नगरसेवक अक्षय ठाकूर, अनंत ठाकूर दरवर्षी आर्थिक योगदान देत असतात. अशा प्रकारे हे शिवमंदिर कळवा परिसरातील शिवभक्तांच्या हृदयातील श्रद्धास्थान ठरले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93184 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..