तिरंगा यात्रेच्या निमित्ताने भाजपमधील गटबाजी पुन्हा उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिरंगा यात्रेच्या निमित्ताने भाजपमधील गटबाजी पुन्हा उघड
तिरंगा यात्रेच्या निमित्ताने भाजपमधील गटबाजी पुन्हा उघड

तिरंगा यात्रेच्या निमित्ताने भाजपमधील गटबाजी पुन्हा उघड

sakal_logo
By

भाईंदर, ता.१६ (बातमीदार) : मिरा भाईंदर भाजपमधील गटबाजी संपुष्टात आली असे थेट प्रदेश पातळीवरुन घोषित करण्यात आले असले तरी भाजपमधील शीतयुद्ध सुरुच आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भाजपच्या नरेंद्र मेहता गटाने व जिल्हाध्यक्ष रवी व्यास गटाने स्वतंत्रपणे तिरंगा यात्रा काढून पक्षातील वाद अद्याप शमला नसल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध राजकीय पक्षांनी मिरा भाईंदरमध्ये तिरंगा यात्रांचे आयोजन केले होते. भाजपकडूनही त्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांनी १४ ऑगस्टला तिरंगा यात्रा काढली होती. यात्रेत स्वत: रवी व्यास, भाजपला नुकतेच समर्थन दिलेल्या आमदार गीता जैन तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पंकज पांडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र या यात्रेपासून नरेंद्र मेहता व त्यांचे समर्थक कार्यकर्ते व नगरसेवक दूर राहिले होते.
मात्र व्यास यांच्या शक्ती प्रदर्शनाला प्रत्युत्तर देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता गटाने देखील १५ ऑगस्टला स्वतंत्रपणे तिरंगा यात्रा काढली. या यात्रेत मेहता गटातील नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे भाजपमध्ये मेहता गट व रवी व्यास गट यांच्यात अद्याप दिलजमाई झाली नसल्याचे उघड झाले. दोन्ही यात्रांद्वारे कोणत्या गटाकडे कार्यकर्ते जास्त आहेत हे दाखवण्याची जणू स्पर्धाच लागली होती.

समेटानंतरही खदखद सुरूच
रवी व्यास यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यापासूनच भाजपमध्ये गटबाजी सुरू आहे. मेहता गटाने व्यास यांना जिल्हाध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर दोन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी गटबाजी संपवण्याचे आवाहन करुन विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण यांना समेटासाठी पाठवले. चव्हाण यांनी दोन्ही गटांना एकत्र आणून भाजपमधील सर्व वाद संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही दिवस पक्षाच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष रवी व्यास व माजी आमदार नरेंद्र मेहता एकाच मंचवार दिसून आले होते. मात्र तिरंगा यात्रेने पक्षात अद्याप खदखद सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
...
यात कोणतेही राजकारण नाही. तिरंगा यात्रेसाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक यांना निमंत्रण देण्यात आले होते
- रवी व्यास, भाजप जिल्हाध्यक्ष
...
पंधरा दिवसांपूर्वीच तिरंगा यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. शिवाय पक्षाने देखील वेगवेगळ्या भागात तिरंगा यात्रा काढण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे गटाची वेगळी यात्रा काढलेली नाही
- नरेंद्र मेहता, माजी आमदार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93190 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..