कामोठेत नागरी समस्यांना उत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामोठेत नागरी समस्यांना उत
कामोठेत नागरी समस्यांना उत

कामोठेत नागरी समस्यांना उत

sakal_logo
By

कामोठे, ता. १६ (बातमीदार) : सिडकोने विकसित केलेल्या कामोठे नोडमध्ये नागरी समस्यांना ऊत आला आहे. हे शहर जरी झपाट्याने विकसित झाले असले, तरी नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याने अखंडित पुरवठ्यापाठोपाठ कामोठे नोडमध्ये विजेची समस्या उद्‍भवली आहे. पक्षभेद, राजकारण बाजूला सारून मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.
कामोठे नोडसाठी प्रतिदिन सुमारे ४० एमएलडी पाण्याची गरज आहे. सिडकोमार्फत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोर्बे धरणातील ३७ व महाराष्ट्र औद्योगिक वसाहत प्राधिकरण यांच्याकडून एक एमएलडी विकतचे पाणी कामोठे नोडला पुरवठा केला जातो. उन्हाळ्यातील पाणीटंचाई, पाणीपुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे कामोठे नोडच्या पाणी पुरवठ्यावर नेहमीच परिणाम होत आहे. सध्या पाणी पुरवठा सुरळीत होत असताना आता वीज समस्येने डोके वर काढल्याने मानसिक त्रास वाढला आहे. सोमवारी रात्री खारघर येथील वीज वाहिनीत बिघाड झाला होता. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारीदेखील कामोठे नोडचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे आठवड्याच्या दर मंगळवारी वीज वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात असताना बत्ती गुल होण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याची माहिती सिटिझन्स युनिटी फोरमच्या सचिव रंजना सडोलीकर यांनी दिली.

प्रतिक्रिया-
भरमसाट बिल, खंडित पुरवठा यामुळे वीज ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीने ही समस्या सोडवली पाहिजे. नागरिकांना वेठीस धरण्याचे काम करू नये.
- सुधा सिंग, गृहिणी, सेक्टर ३४
---
नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे दुर्लक्ष होत आहे. कामोठे शहरात पाणी, वीज, रस्ते, सार्वजनिक आरोग्य, परिवहन सेवा सुरळीत नाही. लोकप्रतिनिधी, प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते यांनी राजकीय मतभेद, राजकारण विसरून लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत.
- सोपान रणदिवे, सेक्टर ७

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93197 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..