काळ्या बाजारात जाणारे धान्य ग्रामस्थांनी पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळ्या बाजारात जाणारे धान्य ग्रामस्थांनी पकडले
काळ्या बाजारात जाणारे धान्य ग्रामस्थांनी पकडले

काळ्या बाजारात जाणारे धान्य ग्रामस्थांनी पकडले

sakal_logo
By

वाडा, ता. १६ (बातमीदार) : काळ्या बाजारात विक्रीला जाणाऱ्या धान्याने भरलेला टॅक्टर कांबारा येथील ग्रामस्थांनी पकडून तो वाडा पोलिसांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी वाडा पुरवठा अधिकारी गौतम भोंगे यांच्या फिर्यादीवरून टॅक्टरचा मालक महेश भोईर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुमारे ६३ हजार रुपये किंमतीचा ४० गोणी गहू पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कांबारे या गावातून धाण्याने भरलेला टॅक्टर काळ्या बाजारात विक्री साठी जाणार असल्याची माहिती येथील तरुणांना मिळाली होती. त्यानंतर तरुणांनी पहारा ठेवला. तेव्हा रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गव्हाने भरलेला टॅक्टर गावाच्या बाहेर निघाल्यानंतर तरुणांनी तो अडविला. टॅक्टरमध्ये ४२ गोणी गहू होता. टॅक्टरचा मालक अंधाराचा फायदा घेत पळून गेला. त्यानंतर तरुणांनी हा टॅक्टर थेट वाडा पोलिस ठाण्यात नेऊन जमा केले. वाडा पोलिसांनी पुरवठा अधिकारी गौतम भोंगे यांची फिर्याद घेऊन टॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करून हा गहू जप्त केला आहे. टॅक्टरमध्ये ४२ गोणीतून सुमारे २१ क्विंटल गहू असून बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ६३ हजार रुपये इतकी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93211 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..