उल्हासनगरातून शिंदे यांच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्रांचा ओघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरातून शिंदे यांच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्रांचा ओघ
उल्हासनगरातून शिंदे यांच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्रांचा ओघ

उल्हासनगरातून शिंदे यांच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्रांचा ओघ

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात उल्हासनगरातील अर्ध्याहून अधिक शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी इनकमिंग केले आहे; तर दुसरीकडे शिंदे यांच्या समर्थनार्थ आणि त्यांना ठामपणे साथ देण्यासाठी शहरातून सत्य प्रतिज्ञापत्रांचा ओघ सुरू झाला आहे.
शहरातून सत्य प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मोठ्या प्रमाणात लक्ष्‍य आहे. शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले ज्‍येष्ठ माजी नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर महाराज, उद्योगपती विक्की भुल्लर यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ५ हजार १०० सत्य प्रतिज्ञापत्र सुपूर्द केली आहेत. भुल्लर महाराज यांच्या कार्यालयात अजूनही प्रतिज्ञापत्र भरण्यासाठी गर्दी सुरू आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे माजी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, उपशहरप्रमुख अरुण आशान यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर लीलाबाई आशान, ज्‍येष्ठ माजी नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर-महाराज, रमेश चव्हाण, विजय पाटील, कलवंतसिंह सोहता, स्वप्नील बागुल, अंकुश म्हस्के, विकास पाटील, माजी नगरसेविका चरणजित कौर भुल्लर, पुष्पा बागुल, शुभांगी बेहनवाल, जोत्‍स्‍ना जाधव, मीनाक्षी पाटील, जयश्री सुर्वे, मिताली चानपूर या माजी नगरसेवकांसोबत ज्‍येष्ठ शिवसैनिक नाना बागुल, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख जयकुमार केणी, युवासेना कल्याण जिल्हा उपसचिव युवराज पाटील, संघटक सागर उटवाल, युवासेनेचे माजी कल्याण उपजिल्हा अधिकारी सोनू चानपूर, शाखाप्रमुख सुनीलसिंग कलवा, युवासेना विधानसभा अध्यक्ष विक्की बागुल आदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93216 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..