‘अमृत सरोवर’ अंतर्गत मातेरा पाडा येथे वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अमृत सरोवर’ अंतर्गत मातेरा पाडा येथे वृक्षारोपण
‘अमृत सरोवर’ अंतर्गत मातेरा पाडा येथे वृक्षारोपण

‘अमृत सरोवर’ अंतर्गत मातेरा पाडा येथे वृक्षारोपण

sakal_logo
By

कासा, ता. १६ (बातमीदार) : केंद्रसरकारच्या अमृत सरोवर अभियान योजनेच्या अंतर्गत १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत देशभरात ५० हजार सरोवर पुन्हा जिवंत आणि विकसित केले जाणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत कासा हद्दीतील मातेरापाडा येथील जीर्ण तलावाची स्वछता व खोदकाम मागील काही दिवसांत करण्यात आले. त्याच बरोबर काही ठिकाणी बांधकाम डागडुजी केली गेली. तर या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तेथे तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. तसेच वनविभागाच्या सहकार्याने तलावाच्या बांधावर लिंबाडा, आंबा, गुलमोहर या रोपांचे वृक्षारोपण देखील करण्यात आले. या कार्यक्रमास कासा ग्रामविकास अधिकारी मोहन पाचलकर, पंचायत समिती सदस्य अरुण कदम, वनविभाग कर्मचारी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93224 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..