मुंबईत ओमायक्रॉनची दहशत कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत ओमायक्रॉनची दहशत कायम
मुंबईत ओमायक्रॉनची दहशत कायम

मुंबईत ओमायक्रॉनची दहशत कायम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : कोरोनावर मात करण्यात यश आले असताना कोरोनाचा उपप्रकार असलेल्‍या ओमिक्रॉन विषाणूचा धोका कायम असल्‍याचे जिनोम सिक्वेन्सिंगच्‍या अहवालातून दिसून आले आहे. जिनोम सिक्वेन्सिंगचा १४ वा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून २३० नमुन्यांची तपासणी केली असता सर्व नमुने ओमिक्रॉनचे आढळले आहेत. दरम्यान, ४३ वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर मृत्यू झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्‍यामुळे मुंबईत ओमिक्रॉनची दहशत कायम असल्‍याचे बोलले जात आहे.
मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाचे नवीन व्हेरिएंट समोर आले आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाचाच उपप्रकार असून कोरोनाची चौथी लाट रोखण्यात पालिकेला यश आले असले, तरी ओमिक्रॉनचे टेन्शन कायम आहे. २३० बाधितांपैकी ७४ जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. पैकी १९ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील तिघांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली; तर एका पुरुष रुग्णाचा मृत्यू ओढवला. ज्या रुग्णाचा मृत्यू ओढवला, त्याचे वय ४३ वर्षे होते. तसेच तो मधुमेह व हृदयविकाराने त्रस्त होता. लक्षणे गंभीर होऊ लागल्यानंतर तीन दिवसांनी त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अहवाल काय सांगतो
२३० नमुन्यांपैकी २८ टक्के अर्थात ६४ नमुने हे बीए २.७४ व्हेरिएन्टचे आहेत.
२० टक्के अर्थात ४५ नमुने हे बीए २.७५ व्हेरिएन्टचे आहेत.
आणखी २० टक्के म्हणजेच ४५ नमुने हे बीए २.७६ व्हेरिएन्टचे आहेत.
तर १२ टक्के अर्थात २८ नमुने हे बीए २.३८ व्हेरिएन्टचे आहेत.
८ टक्के म्हणजेच १९ नमुने हे बीए ५ व्हेरिएन्टचे आहेत.
तर ७ टक्के अर्थात १८ नमुने हे इतर व्हेरिएन्टचे आहेत.
४ टक्के म्हणजेच ९ नमुने हे बीए २.३८.१ व्हेरिएन्टचे आहेत.
तर १ टक्के अर्थात २ नमुने हे बीए ४ व्हेरिएन्टचे आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93230 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..