सिद्धगड स्मारक येथे तिरंगा ध्वज फडकावून हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा वीर हिराजी पाटील यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धगड स्मारक येथे तिरंगा ध्वज फडकावून हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा वीर हिराजी पाटील यांना अभिवादन
सिद्धगड स्मारक येथे तिरंगा ध्वज फडकावून हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा वीर हिराजी पाटील यांना अभिवादन

सिद्धगड स्मारक येथे तिरंगा ध्वज फडकावून हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा वीर हिराजी पाटील यांना अभिवादन

sakal_logo
By

मुरबाड, ता. १६ (बातमीदार) ः तालुक्यातील सिद्धगड हुतात्मा स्मारक येथे सोमवारी (ता. १५) ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हुतात्मा वीर हिराजी पाटील यांना अभिवादन करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा भाई कोतवाल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ब्रिटिश साम्राज्याविरोधात सशस्त्र लढा दिला होता. कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली ठाणे व रायगड जिल्ह्यातील अनेक तरुण लढ्यात सहभागी झाले होते. २ जानेवारी १९४३ रोजी हिराजी पाटील व भाई कोतवाल यांना सिद्धगड येथील जंगलात ब्रिटिशांनी गोळ्या झाडून ठार मारले होते. तेथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हुतात्मा ज्योत व समाधी बांधण्यात आली आहे. या ठिकाणी बोरवाडी येथील घिगे कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पवार, सुरेश हिंदुराव, अशोक देसले, योगेंद्र बांगर, जयदीप अडाईंगे, किशोर गायकवाड, गणेश गवाळे, सिद्धगड स्मारक समितीचे सचिव मुरलीधर दळवी आदींनी पुष्पहार अर्पण करून व तिरंगा फडकावत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93233 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..