गोविंदवाडी वळण रस्त्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोविंदवाडी वळण रस्त्याची दुरवस्था
गोविंदवाडी वळण रस्त्याची दुरवस्था

गोविंदवाडी वळण रस्त्याची दुरवस्था

sakal_logo
By

कल्याण, ता. १६ (बातमीदार) ः कल्याण-शिळफाटा रस्त्यावर पत्रीपुल ते दुर्गाडी चौकाला जोडणाऱ्या गोविंदवाडी वळण रस्त्याची देखभाल-दुरुस्ती करण्यात न आल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. हा वळण रस्ता रस्ते विकास महामंडळाने एक ते दीड वर्षांपूर्वी पालिकेला हस्तांतरित केला होता. तरीही याची दुरुस्ती का करण्यात आली नाही, असा सवाल शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख सचिन बासरे यांनी केला आहे.

राज्य शासनाने भिवंडी, कल्याण, शिळफाटा रस्त्यावरील टोलनाक्यावरील वसुली ९ मार्च २०२१ रोजी बंद केली. रस्ते विकास महामंडळाने गोविंदवाडी रस्ता बांधून केडीएमसीकडे हस्तांतरण केला. हा रस्ता २०२१ पासून केडीएमसीकडे असूनही याची देखभाल-दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप बासरे यांनी केला आहे. अगोदरच या रस्त्यावरील अर्धवट कामे, खराब रस्ते यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी होते. याचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचा आरोप बासरे यांनी केला आहे. लवकरात लवकर रस्तेदुरुस्ती करा; अन्यथा शिवसेना स्टाईलने समाचार घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93234 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..