तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १६ (बातमीदार) ः गोवंडीच्या रफिक नगर परिसरात तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला शिवाजी नगर पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या आहेत. अब्दुल शेख (४५ वर्षे) असे त्याचे नाव असून तो पीडितेच्या वडिलांचा मित्र आहे. पीडितेच्या पोटात दुखू लागल्‍यानंतर ती गरोदर असल्याचे कळले व ही बाब समोर आली. अब्दुल सध्या पोलिस कोठडीत आहे.
पतीपासून विभक्त झालेली तरुणी रफिक नगर भागात सावत्रआईसोबत राहते. आई कचरा वेचण्याच्‍या कामासाठी गेल्यावर ती तरुणी घरात एकटीच असायची. ती एकटी असल्याचा फायदा घेत तिला जेवण देण्याच्या बहाण्याने अब्दुल घरी यायचा व तिच्यावर अत्याचार करायचा. मागील अनेक महिन्यांत त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. मागील आठवड्यात तिच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिने ही बाब एका महिलेला सांगितली. त्यानंतर तिला स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले तेव्हा ती गरोदर असल्याचे कळले. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. या गुन्ह्याची नोंद करत पोलिसांनी त्याला तात्काळ बेड्या ठोकल्या. सुट्टीच्या न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93239 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..