मुलांसाठी जिज्ञासूवृत्ती, विज्ञानदृष्टी महत्वाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांसाठी जिज्ञासूवृत्ती, विज्ञानदृष्टी महत्वाची
मुलांसाठी जिज्ञासूवृत्ती, विज्ञानदृष्टी महत्वाची

मुलांसाठी जिज्ञासूवृत्ती, विज्ञानदृष्टी महत्वाची

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ ः विज्ञाननिष्ठ भारताच्या निर्मितीसाठी देशाचे उज्ज्वल भविष्य असणाऱ्या लहान मुलांमध्ये विज्ञानदृष्टी जागृत करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आधुनिक काळाची पावले ओळखत बहुआयामी शिक्षण देण्याची आवश्यकता ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई महापालिकेतर्फे ‘विज्ञानाधिष्ठित समाजाकडे’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मुलांमध्ये जिज्ञासावाढीसाठी त्यांना प्रश्न विचारण्याची सवय लावण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शिक्षकांना प्रतिष्ठा देणे, ही समाजाची जबाबदारी असल्याचे विषद करीत त्यांनी मोबाईलमुळे साऱ्या जगाच्या माहितीशी जोडला गेले आहात. त्यामुळे शिक्षकांनीही माहितीच्या दृष्टीने अद्ययावत राहण्याची, नवा विद्यार्थी येतोय त्याच्यासाठी नवे होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘राईट टू एज्युकेशन’च्या पुढे जाऊन ‘डिजिटल राईट टू एज्युकेशन’ची गरज व्यक्त डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली. या वेळी कोरोना काळात मुलांना ऑनलाईन शिक्षणामुळे वेगळ्या स्वरूपाच्या शिक्षण पद्धतीचा अनुभव घेता आल्याचे सकारात्मक मत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मांडले. या वेळी विद्यार्थ्यांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांनाही त्यांनी समर्पक उत्तरे विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत दिली. या वेळी लहानपणी शाळेत असताना डॉ. जयंत नारळीकर यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर भारावले गेल्याची आठवण महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितली.
---
माशेलकरांचे विद्यार्थ्यांना पाच मंत्र
७९ वर्षांच्या जीवनातील अनुभवांच्या परिपाकातून आलेले ५ माशेलकर मंत्र या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. महत्त्वाकांक्षा उंच ठेवा, प्रज्ञेला परिश्रमाची जोड द्या, समस्येचा भाग न होता उत्तराचा भाग होण्याचा कसोशीने प्रयत्न करा, आत्मविश्वास व चिकाटीने काम करीत राहा आणि उत्तमतेच्या यशाच्या पायऱ्यांना शेवट नसतो या ५ अनुभवसिद्ध मंत्रांचे महत्त्व त्यांनी विविध प्रसंगांतून सहजपणे उलगडले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93240 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..