बंद असलेली प्रवासी बोटसेवा सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंद असलेली प्रवासी बोटसेवा सुरळीत
बंद असलेली प्रवासी बोटसेवा सुरळीत

बंद असलेली प्रवासी बोटसेवा सुरळीत

sakal_logo
By

उरण, ता. १६ (वार्ताहर) ः वादळी वाऱ्यामुळे बंद असलेली जलसेवा सहा दिवसांनंतर तीन नंबरचा बावटा उतरवण्यात आल्याने पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गेटवे-एलिफंटा, गेटवे- जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या मार्गावरील जलवाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
वादळी हवामान आणि खराब हवामानामुळे हवामान विभागाने रेड ॲलर्ट जारी केला होता. त्यामुळे विविध बंदरांत खबरदारीची उपाययोजना म्हणून तीन नंबरचा बावटा लावण्यात आला होता. या इशाऱ्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून गेटवे-एलिफंटा ही प्रवासी सेवा खंडित करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी, पर्यटकांची गैरसोय झाली होती; मात्र तीन नंबरचा बावटा उतरवण्यात आला असल्यामुळे शनिवारपासून सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्ववत झाली असून मासेमारी बोटीही खोल समुद्रात रवाना झाल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी प्रकाश कांदळकर यांनी दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93244 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..