केळवे पर्यटन स्थळावर पोलिसांची ‘नैतिक’ गुंडगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळवे पर्यटन स्थळावर पोलिसांची ‘नैतिक’ गुंडगिरी
केळवे पर्यटन स्थळावर पोलिसांची ‘नैतिक’ गुंडगिरी

केळवे पर्यटन स्थळावर पोलिसांची ‘नैतिक’ गुंडगिरी

sakal_logo
By

पालघर, ता. १६ (बातमीदार) ः केळवे पर्यटनस्थळी दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार प्राप्त होतो. मात्र, सध्या इथे किनाऱ्यावर व सुरूच्या बागेत फिरण्यासाठी आल्यानंतर पोलिस दमबाजी करून पैसे उकळत असल्याचा आरोप पर्यटकांकडून करण्यात येत आहे. विशेषकरून पोलिस तरुण जोडप्यांकडून पैसे उकळतात. यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असून याचा पर्यटनावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

समुद्रकिनारी असलेल्या सुरूच्या बागेत तरुण-तरुणी फिरायला येत असतात; मात्र तरुणवर्गास पोलिसांच्या जाचाला सामोरे जावत लागत आहे. गप्पा मारत बसलेल्या मित्र-मैत्रिणींना पोलिस दमदाटी करतात. तरुणांना त्यांचे लग्न झाले आहे की नाही, याची विचारणा करतात. आधार कार्ड, ओळखपत्र दाखवायला सांगतात. ते नसेल, तर त्यांना पोलिस ठाण्यात नेण्याची धमकी देतात. तरुण-तरुणी सोडण्याची विनंती करायला लागल्यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात. इथे येणाऱ्या अनेक तरुण जोडप्यांना हा अनुभव आल्याचे सांगण्यात येत आहे. या दमबाजीने आपल्याला भीती वाटली असून पुन्हा केळव्याला कधी जाणार नाही, असे एका तरुणाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. केळवे सागरी पोलिस दलाकडून बऱ्याच महिन्यांपासून अशा प्रकारचा त्रास पर्यटकांना दिला जात आहे, अशी तक्रार पर्यटक करत आहेत. केळवे समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात मुंबई, नाशिक, गुजरात, व परिसरातील पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. पर्यटकांमुळे इथल्या स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत; पण पोलिसांच्या जाचाला कंटाळून पर्यटक केळवे पर्यटनस्थळी पाठ फिरवत आहेत, असे एका हॉटेल व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93248 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..