विकासाकाविरोधात सिध्दार्थ कॉलनीतील रहिवाशांचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासाकाविरोधात सिध्दार्थ कॉलनीतील रहिवाशांचे आंदोलन
विकासाकाविरोधात सिध्दार्थ कॉलनीतील रहिवाशांचे आंदोलन

विकासाकाविरोधात सिध्दार्थ कॉलनीतील रहिवाशांचे आंदोलन

sakal_logo
By

चेंबूर, ता. १६ (बातमीदार) ः सिद्धार्थ कॉलनी एसआरए प्रकल्प भूमिपूजनाला कोणतीही रीतसर परवानगी नसतानादेखील विकासक भूमिपूजन करीत असल्याच्या निषेर्धात संतप्त रहिवाशांनी सायन-ठाणे मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्‍कळित झाली होती.
चेंबूर येथील घाटकोपर-सायन मार्गावर असलेली सिद्धार्थ कॉलनीकडे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून पहिले जाते. या कॉलनीत ३५०० पेक्षा अधिक घरे आहेत. २००५ पासून या कॉलनीचा विकास करण्याकरिता काही कार्यकर्ते एका आरपीआय नेत्याला घेऊन आले होते. त्या विकासकाने विकास केला नाहीच; मात्र कित्येक विकासक कॉलनीच्या माथ्यावर मारले असल्‍याचा रहिवाशांचा आरोप आहे.

रहिवाशांना अंधारात राहावे लागते
विकास करण्याकरिता आलेल्या विकासकांनी माघार घेऊन परस्पर एका नवीन विकासकाशी करार केला आहे, परंतु या विकासकाने आचार्य नगर एसआरए प्रकल्प योग्य पद्धतीने केला नसल्याने रहिवासी प्रचंड नाराज झाले आहेत. त्यातच सर्व विकासकांनी थकीत वीज बिल भरतो असे आश्वासन देऊनसुद्धा वीज कंपनीचे एकूण १०९ कोटी थकवले आहेत. आता थकीत वीज बिल भरणा करा, असे सांगत वीज कंपनी रहिवाशांच्या मागे लागली आहे.
एकदम वीज बिल भरता येत नसल्याने कंपनीने कित्येक महिने वीज खंडित सत्र सुरू केले असल्याने रहिवाशांना अंधारात राहण्याची वेळ आलेली होती. वीज खंडित करण्याचे काम हे विकासक वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून करीत असल्याचा संशय घेत कित्येक रहिवासी विकासकाच्या विरोधात गेले आहेत.

मध्‍यरात्री केले होते आंदोलन
वीज खंडित होत असल्याने रहिवाशांनी सायन-ठाणे मार्गावर रात्री १ वाजता चार ते पाच तास रास्ता रोको आंदोलन केले होते. विकासक प्रकल्पाचे भूमिपूजन १५ ऑगस्ट दिवशी करणार असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी उद्यानाबाहेर मोठे बॅनर लावले होते, तेही रहिवाशांनी पालिकेतर्फे काढून व फाडून टाकले. तसेच विकासक हाटाव या मागणीकरिता सायन-घाटकोपर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी रहिवाशांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली.

पोलिसांच्‍या आश्‍वासनानंतर आंदोलन थांबले
विकासकावर एफआयआर दाखल करण्यात यावा, या मागणीकरिता चेंबूर पोलिस ठाण्यावरही रहिवाशांनी मोर्चा काढला. जोपर्यंत विकासकावर एफआयआर दाखल करणार नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असे रहिवाशांनी पोलिसांना सांगितले. त्‍यावर चेंबूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी आम्ही विकासकावर एफआयआर दाखल करू; तुम्ही आंदोलन समाप्त करा, असे आश्वासन दिल्यावर संतप्त रहिवाशांनी आंदोलनाचा समारोप केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93251 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..