काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा
काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा

काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १६ : देशाच्या अमृतमहोत्सव स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेसतर्फे देशभरात आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचधर्तीवर नवी मुंबई काँग्रेस कमिटीतर्फे आझादी गौरव पदयात्रा घेण्यात आली होती. नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली वाशी सेक्टर १७ ते कोपरखैरणेपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत शेकडोच्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. त्यानिमित्ताने बलिदान देणाऱ्या क्रांतिकारी आणि जवानांचा गौरव करण्यासाठी काँग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन केले जात आहे. संध्याकाळी वाशी सेक्टर १७ येथून पदयात्रेला सुरुवात झाली. या यात्रेत ढोल, ताशा पथकांचा समावेश होता. तसेच सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांकडून भारतमातेचा जयघोष करण्यात आला. कोपरखैरणेपर्यंत काढण्यात आलेल्या या यात्रेत तब्बल ७०० ते ८०० कार्यकर्ते सहभागी झाल्याची माहिती कौशिक यांनी दिली. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रमोद मोरे, प्रदेश काँग्रेस सचिव आनंद सिंग, नवी मुंबई महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93252 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..