मुंबई अग्निशमन दलाच्या जवानाची सर्वोच्च कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई अग्निशमन दलाच्या जवानाची सर्वोच्च कामगिरी
मुंबई अग्निशमन दलाच्या जवानाची सर्वोच्च कामगिरी

मुंबई अग्निशमन दलाच्या जवानाची सर्वोच्च कामगिरी

sakal_logo
By

अग्निशमन दलाच्या जवानाकडून ‘माऊंट एल्ब्रूस’ सर
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त युरोपातील सर्वोच्च शिखरावर फडकावला तिरंगा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जगभरातील प्रमुख वास्तूंवर तिरंग्याचे दर्शन झाले; पण मुंबईच्या अग्निशमन दलातील जवान मच्छिंद्र शेळके यांनी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एल्ब्रूसवर झेंडा फडकावण्याची अभिमानास्पद कामगिरी केली आहे. रशियातील माऊंट एल्ब्रूस शिखर सर करत ५६४२ मीटर उंचीवर त्यांनी तिरंगा फडकावला आहे.

मुंबईच्या प्रभादेवी परिसरात प्रणित शेळके राहतात. सध्या ते अग्निशन दलात कार्यरत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १५ ऑगस्ट रोजी त्यांनी एल्ब्रूस शिखरावर झेंडा फडकावला. एका विशेष मोहिमेच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या कामगिरीचे मुंबईसह महाराष्ट्रातूनही कौतुक होत आहे. अतिशय धाडसी आणि साहसी मोहिमेत शेळके यांनी कामगिरी पार पाडली.

योगेश बडगुजर आणि मच्छिंद्र शेळके दोघेही मुंबई अग्निशमन दलातील नियंत्रण कक्षात फायरमन म्हणून कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून ते गिर्यारोहण मोहिमांमध्ये सहभाग घेत आहेत. त्यासाठीचे विशेष प्रशिक्षणही त्यांनी घेतले आहे. भारतातील अनेक पर्वतांच्या मोहिमा दोघांनी एकत्रित केल्या आहेत. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीही त्यांना त्यासाठी आर्थिक मदत केली आहे. माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे लक्ष्य आता दोघांनी ठेवले आहे.

एल्ब्रूस शिखरावर दोघांनी एका चमूसोबत गिर्यारोहण केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तिरंगा फडकावण्याची कामगिरी अग्निशमन दलासाठी अतिशय अभिमानाची आणि गौरवाची असल्याचे मत अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. एरवी अशा मोहिमांसाठी लागणारा कालावधी पाहता सुट्ट्यांची मर्यादा असते; परंतु दोघांनीही आपल्या छंदासाठी रजांचा विचार न करता अग्निशमन दलासाठी अतिशय अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे. यापुढील गिर्यारोहण मोहिमांसाठी दलाकडून शक्य ती आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

असा आहे माऊंट एल्ब्रूस
माऊंट एल्ब्रूस युरोपमधील सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची १८ हजार ५१० फूट आहे. काळा समुद्र व कॅस्पियन समुद्राच्या मध्ये माऊंट शिखर वसले आहे. जॉर्जिया देशाच्या सीमेपासून २० किलोमीटरवर माऊंट एल्ब्रूस असून, पृथ्वीवरील सर्वांत उंच असलेल्यांपैकी एक असा निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. त्याचे तापमान उणे २५ अंशांपर्यंत जात असते. वर्षभर येणारी मोठमोठी वादळे, हाडे गोठवणारी थंडी इत्यादी माऊंट अल्ब्रूस चढाईतील अडचणी आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93253 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..