सानपाड्यात सोन्याच्या दहीहंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सानपाड्यात सोन्याच्या दहीहंडी
सानपाड्यात सोन्याच्या दहीहंडी

सानपाड्यात सोन्याच्या दहीहंडी

sakal_logo
By

जुईनगर, ता. १६ (बातमीदार)ः कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सव साजरा करता आला नाही. यंदा मात्र मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी होणार असल्याने नवी मुंबईतदेखील मंडळांच्या तयारीला वेग आला आहे. वेगवेगळ्या थरांच्या दहीहंडींची तयारी चालू असताना सानपाडा येथील सोन्याच्या दहीहंडी गोविंदा पथकाचे लक्ष वेधून घेत नवी मुंबईसह ठाणे, मुंबई, पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील गोविंदा पथके हजेरी लावणार असल्याची माहिती सानपाडा येथील समाजसेवक पांडुरंग आमले यांनी दिली आहे.
सानपाडामधील हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानामध्ये साई सोन्याची दहीहंडी होणार आहे. या मंडळाचे हे दुसरे वर्ष असून यंदा साई सोन्याच्या दहीहंडीची किंमत तीन ते सव्वा तीन लाख रुपये ठेवण्यात आली आहे. यासाठी गोविंदा पथकांना ८ ते ९ थर लावावे लागणार असून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गोविंदा पथकाला लाखोंची पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच मंडळाने गोविंदाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केली आहे. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते आणि विविध सेलिब्रेटीदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
---
सोन्याच्या दहीहंडीसाठी ७० ते ८० गोविंदा पथके उपस्थित राहतील. तसेच मानाच्या हंडीसाठी १५ ते २० पथके उपस्थित राहणार आहेत. तसेच दहीहंडीच्या दिवशी पाच अपंग विद्यार्थ्यांना सायकल देऊन त्यांचे पालकत्व स्वीकारणार आहे.
- पांडुरंग आमले, समाजसेवक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93262 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..