विद्याविहार शाळेची रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्याविहार शाळेची रॅली
विद्याविहार शाळेची रॅली

विद्याविहार शाळेची रॅली

sakal_logo
By

विरार, ता. १६ (बातमीदार) : भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीस ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून विरारमधील विद्याविहार शाळेने रॅलीचे आयोजन केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सर्व परिसर अगदी तिरंगामय झाला होता. बँड पथकाच्या नादात, गगनभेदी घोषणा देत विद्यार्थी वसईमधून येणाऱ्या ३०० फूट तिरंगा रॅलीत सहभागी झाले. तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. देशभक्तिपर गीते, नृत्य, नाटक यांच्या साथीने वातावरण अगदी मंत्रमुग्ध झाले होते. शाळेतील शिशू ते प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी देशातील थोर क्रांतिकारक व समाजसेवकांची वेशभूषा केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93271 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..