वसईत स्वातंत्र्य संग्रामावर चित्र प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत स्वातंत्र्य संग्रामावर चित्र प्रदर्शन
वसईत स्वातंत्र्य संग्रामावर चित्र प्रदर्शन

वसईत स्वातंत्र्य संग्रामावर चित्र प्रदर्शन

sakal_logo
By

विरार, ता. १६ (बातमीदार) : वसई विकासिनी दृक् कला महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त प्रभाकर घरत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून स्वातंत्र्यसंग्रामावरील चित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये फौऊंडेशन कोर्स, कला शिक्षणशास्र पदविका, रेखा व रंगकला पदविका, अप्लाईड आर्टच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक सहभाग नोंदवला. या वर्षांपासून महाविद्यालयात ॲडव्हान्स ॲनिमेशन कोर्स सुरू करून पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एक वेगळे दालन उघडले आहे. विश्‍वस्त सचिव भरत दोषी, कार्याध्यक्ष शिरीष पाठारे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. विजय वर्तक, जयंत देसले, फ्रँकलिन सिरजो, नरेंद्र पाटील, दिगंबर गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93272 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..