''आरे ''त जागोजागी खंड्यांचे साम्राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''आरे ''त जागोजागी खंड्यांचे साम्राज्य
''आरे ''त जागोजागी खंड्यांचे साम्राज्य

''आरे ''त जागोजागी खंड्यांचे साम्राज्य

sakal_logo
By

‘आरे’त जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य
दुरुस्ती न झाल्यास रस्ता अडवण्याचा इशारा

जोगेश्‍वरी, ता. १६ (बातमीदार) ः गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरू लागले आहेत. खड्ड्यांमुळे त्यांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्ता दुरुस्त झाला नाही, तर एकही गाडी आत सोडण्यात येणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
आरे कॉलनीतील मुख्य दिनकरराव देसाई मार्गावर युनिट क्र २, छोटा काश्मीर, युनिट क्र. ६, आरे डेअरी, युनिट क्र. १६ इत्यादी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत आहे. आदर्शनगर, नवजीवन नगर, मयूर नगर, रॉयल पाम्स इत्यादी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. महापालिकेतर्फे मुख्य दिनकरराव देसाई मार्गावर सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत असल्याने युनिट क्र. ५ ते युनिट क्र. १६ रस्ता बंद केला आहे. त्याला जवळजवळ सहा महिने झाले. परिणामी युनिट क्र. २, छोटा काश्मीर, युनिट क्र. ५, युनिट क्र. १६ इत्यादी ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत. रहिवाशांच्या मागणीनुसार सहाय्यक आयुक्त पी/दक्षिण विभाग व आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरे पोलिस प्रशासन आणि आरे वाहतूक विभाग यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे असल्‍याचे मुंबई विभागीय आदिवासी काँग्रेसचे अध्‍यक्ष सुनील कुमरे यांनी सांगितले. आरेतील रस्ते दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत विभागीय रहिवाशांशिवाय बाहेरील एकही गाडी आत सोडू दिली जाणार नाही, असा इशारा निवेदनात देण्यात येणार असल्याचे कुमरे यांनी म्‍हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93277 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..