प्रतिबंधित हुक्का विक्रीप्रकरणी दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिबंधित हुक्का 
विक्रीप्रकरणी दोघांना अटक
प्रतिबंधित हुक्का विक्रीप्रकरणी दोघांना अटक

प्रतिबंधित हुक्का विक्रीप्रकरणी दोघांना अटक

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : मुंबईत खासगी पार्ट्यांना प्रतिबंधित हुक्का पुरवल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी दोघांना अटक केली. मोहम्मद हूस आणि मोहम्मद पटारी अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी हुक्का तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त केले. दोघेही आरोपी खासगी पार्ट्यांना हुक्क्याची भांडी, पाईप आणि फ्लेवरयुक्त तंबाखूचा पुरवठा करत होते. दोन्ही आरोपी यापूर्वी एका हुक्का पार्लरमध्ये काम करत होते. पोलिसांच्या छापेमारीत त्यांची नोकरी गेली होती; मात्र त्यांच्याकडे हुक्का तयार करण्याचे कौशल्य होते. त्यामुळे ते विविध समारंभांना, पार्ट्यांना हुक्का पुरवत असत. अशाच प्रकारे खासगी पार्ट्यांना हुक्का पुरवल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93278 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..