५०० किलो अमली पदार्थ जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

५०० किलो अमली पदार्थ जप्त
५०० किलो अमली पदार्थ जप्त

५०० किलो अमली पदार्थ जप्त

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने एमडी या अमली पदार्थाचे उत्पादन करणाऱ्या गुजरातमधील कारखान्याचा पर्दाफाश केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे एक हजार २६ कोटी किमतीचे आणि ५०० किलोपेक्षा अधिक प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत एका महिलेसह सात आरोपींना अटक केली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातच्या अंकलेश्वर येथे एका छोटेखानी कारखान्यावर नुकताच छापा टाकला. त्या वेळी कारखान्यात सुमारे ५१३ किलो एमडी नामक अमली पदार्थ आढळले. याप्रकरणी कारखान्याचे मालक गिरीराज दीक्षित यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे दीक्षितने रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे.
यापूर्वी नालासोपारा येथील एका औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीवर अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकला होता. त्या वेळी पोलिसांनी एक हजार ४०० कोटी रुपये किमतीचे ७०० किलो एमडी अमली पदार्थ जप्त केले. तसेच या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93279 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..