इंग्रजी शाळांत आदिवासी विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्रजी शाळांत आदिवासी विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक
इंग्रजी शाळांत आदिवासी विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक

इंग्रजी शाळांत आदिवासी विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक

sakal_logo
By

पालघर, ता. १६ (बातमीदार) ः इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आदिवासी समूहाच्या विद्यार्थ्यांशी भेदभाव केला जातो. त्यांना वेगळे शिकवले जाते. त्यांच्यासाठी वेगळी सोय केली जाते, असा आरोप करत या शाळांची तपासणी करावी, अशी मागणी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन दिले आहे. हा प्रकार त्वरित थांबवण्यात यावा, याविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी यात करण्यात आली आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना महाबळेश्वर, पाचगणी, नगर या आणि अन्य ठिकाणी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्यासाठी सरकारच्या आदिवासी विकास विभागाची एक योजना आहे. या योजनेमध्ये आदिवासी दुर्गम भागातील इयत्ता पहिलीकरिता प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची निवड करून नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवण्यात येते. इतर विद्यार्थ्यांसोबत शिकल्याने आदिवासी विद्यार्थीही सक्षम बनावेत, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, असा यामागे हेतू आहे. पण, अनेक शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप होत आहे. या विद्यार्थ्यांना वेगळ्या ठिकाणी शिकवले जाते. त्यांची वेगळ्या ठिकाणी सोय केली जाते, अशा तक्रारी विद्यार्थ्यांकडून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास डळमळीत होत असल्याचे सांबरे यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93290 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..