महिला पोलिसाची पोलिस ठाण्यात गळफास घेत आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला पोलिसाची पोलिस ठाण्यात गळफास घेत आत्महत्या
महिला पोलिसाची पोलिस ठाण्यात गळफास घेत आत्महत्या

महिला पोलिसाची पोलिस ठाण्यात गळफास घेत आत्महत्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : पोलिस ठाण्यातच गळफास घेऊन महिला कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १६) घडली आहे. ठाण्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात ही घटना मंगळवारी दुपारी समोर आली. घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

अनिता व्हावळ (३४) असे या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्या ठाण्याच्या ज्ञानेश्वर नगर परिसरात राहत होत्या. श्रीनगर पोलिस ठाण्यात महिला पोलिस नाईक पदावर त्या कार्यरत होत्या. २००८ च्या बॅचच्या त्या महिला पोलिस कर्मचारी होत्या. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता त्या नेहमीप्रमाणे ड्युटीवर हजर झाल्या. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी महिला कक्षात फॅनला गळफास घेतल्याचे समोर आले. त्यांच्या पश्चात दोन मुली, पती असा परिवार आहे. या घटनेबाबत श्रीनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच ठाणे पोलिस आयुक्तालयाचे सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, गुन्हे शाखा वागळे युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी श्रीनगर पोलिस ठाण्याला भेट देत प्रकरणाची माहिती घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93296 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..