ट्रेलरवर धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रेलरवर धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू
ट्रेलरवर धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रेलरवर धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : ट्रेलरवर दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना उरण-पनवेल मार्गावर गव्हाण फाटा येथे मंगळवारी (ता. १६) सकाळी घडली. ट्रेलर निष्काळजीपणे धोकादायक स्थितीत रस्त्यावर उभा केल्यामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी ट्रेलरचालक ब्रिजेश लालपती पाल (वय २६) याला अटक केली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव यज्ञेश कोळी (वय ३५) असे आहे.

यज्ञेश कोळी उरणच्या करंजा नवापाडा भागात राहत असे. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास यज्ञेश हे करंजा नवापाडा येथून आपल्या दुचाकीवरून पनवेल येथे कामानिमित्त जात होते. या वेळी गव्हाणफाटा ते पनवेल मार्गावरील साई ढाब्यासमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर त्यांची दुचाकी जोरात आदळली. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, ट्रेलर चालक ब्रिजेश पाल हा आपल्या ताब्यातील ट्रेलर रस्यावर उभा करून साई ढाबा येथे आंघोळीकरिता गेल्याचे आढळून आले. रस्त्यावर ट्रेलर उभा करताना त्याने ट्रेलरचे लाईट सुरू ठेवले नसल्याचे तसेच रिफ्लेक्टरदेखील लावला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे भरपावसात पाठीमागून येणाऱ्या यज्ञेश कोळी याला ट्रेलर उभा आहे की चालू आहे हे समजले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93299 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..