लल्लुभाई वसाहतीतील रस्ता कचऱ्याने व्यापला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लल्लुभाई वसाहतीतील रस्ता कचऱ्याने व्यापला
लल्लुभाई वसाहतीतील रस्ता कचऱ्याने व्यापला

लल्लुभाई वसाहतीतील रस्ता कचऱ्याने व्यापला

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १७ (बातमीदार) ः मानखुर्दच्या लल्लूभाई वसाहत तसेच पीएमजीपी वसाहतीतील रस्ता कचऱ्याने व्यापल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‘क्लीनअप चकाचक मुंबई’ असा फलक असलेल्या पालिकेच्या यंत्राच्या चोहोबाजूला कचरा अस्ताव्यस्त पसरलेला आहे. त्यामुळे पालिकेच्या धोरणाला स्वतः पालिकेनेच सुरुंग लावला असल्याचे दिसत आहे.
येथील कचऱ्याने अर्धा रस्ता व्यापला आहे. त्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणाहून जाताना नाकाला रुमाल लावत जावे लागत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरकडून मानखुर्दच्या लल्लूभाई वसाहतीत जाताना मुख्य रस्त्यावरील उद्यानासमोर वाहनांमध्ये कचरा भरण्याची पालिकेची यंत्रणा आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या या यंत्रातून कचरा मोठ्या वाहनांमध्ये भरला जातो. त्यामुळे या यंत्राच्या लगत कचऱ्याचा ढीग असतो. हा कचरा पसरत जाऊन आता रस्त्याचा अर्धा भाग व्यापला गेला आहे. त्यात अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींनी त्या ठिकाणी चिखल झाला आहे. कचरा ओला झाल्यामुळे त्याची दुर्गंधी तसेच डास, माशांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे नागरिकांना या कचऱ्यातून वाट काढत जावे लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील यामुळे गंभीर होताना दिसत आहे. अशीच परिस्थिती पीएमजीपी वसाहतीतील मुख्य रस्त्यावर दिसत आहे. त्यामुळे पालिकेने तात्काळ आवश्यक उपाययोजना करावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. कचरा रस्त्यावर पसरू नये तसेच त्याची दुर्गंधी येऊ नये याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

लल्लूभाई येथील कचऱ्यासंदर्भात नुकतीच निविदा निघाली असून लवकरच त्या ठिकाणाहून ते हलवून दुसरीकडे स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे ती समस्या लवकरच सुटेल. पीएमजीपी वसाहतीतील रस्त्यावर कचरा पसरणार नाही याची काळजी घेण्यात येईल.
- एम. एच. मोमीन, घनकचरा व्यपस्थापन अधिकारी, एम-पूर्व विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93306 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..