दहिहंडी स्पेशल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहिहंडी स्पेशल
दहिहंडी स्पेशल

दहिहंडी स्पेशल

sakal_logo
By

दहीहंडी स्पेशल

कुकशेत येथे दहीहंडी उत्सव
नेरूळ ः दरवर्षीप्रमाणे नेरूळ नोडमधील कुकशेत गावात दहीहंडी उत्सवाचा थरार रंगणार आहे. शुक्रवारी १९ ऑगस्ट रोजी कुकशेत गावातील गावदेवी मैदानात खुल्या गटामध्ये दहीहंडी फोडणाऱ्याला २५ हजार रुपये रोख पारितोषिक, पारंपरिक मानाची दहीहंडी फोडणाऱ्यास पाच हजार रुपये; तर दहीहंडी सलामी देणाऱ्या पथकांना हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. कुकशेत गावातील जय गजानन मित्र मंडळाच्या या उत्सवामध्ये दहीहंडी पथकांनी व नवीमुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी केले आहे.
----
उरणमध्ये भव्यदिव्य दहीहंडीचे आकर्षण
श्री कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सवाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील विजय-विकास सामाजिक संस्था नवघर-उरणतर्फे एक लाख ११ हजार १११ रुपयांच्या भव्यदिव्य दहीहंडी उत्सव नवघर येथील महा ई सेवा केंद्र, नित्यानंद मंदिर येथे होणार आहे. या दहीहंडी उत्सवात सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना एक हजार १११ रुपये व भव्य चषक देण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्याने यंदा दहीहांडीचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय विजय विकास सामाजिक संस्थेकडून घेण्यात आला आहे.
़़़़़
बेलापूरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव
बेलापूर ः सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलजवळ असलेल्या श्री श्री राधा गिरीधारी मंदिर नववृंदावन धाम येथे गुरुकृपा मूर्ती भक्ती स्वरूप तीर्थ महाराज यांचे मार्गदर्शन, जन्माष्टमी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. या उत्सवातील ‘रासलीला’ व विद्युत रोषणाईतील राधाकृष्ण यांचे देखावे हे मुख्य आकर्षण राहणार आहे. यासाठी कोलकाताच्या चंदन नगर येथून विद्युत रोषणाईचे देखावे आणले गेले आहेत. तसेच शुक्रवारी दडीहांडीचा उत्सवदेखील होणार असल्याने या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93322 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..