लोकलमधून लाखोच्या मोबाईलची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकलमधून लाखोच्या मोबाईलची चोरी
लोकलमधून लाखोच्या मोबाईलची चोरी

लोकलमधून लाखोच्या मोबाईलची चोरी

sakal_logo
By

नवी मुंबई (वार्ताहर) : ऐरोली येथे जाण्यासाठी वाशी ठाणे लोकलमध्ये बसलेल्या तरुणीच्या हातातील मोबाईल फोन चालत्या लोकलमध्ये खेचल्याची घटना रविवारी रात्री वाशी रेल्वे स्थानकात घडली. या प्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
ऐरोली येथे राहणारी करिष्मा वैश (२८) ही तरुणी वाशीमध्ये कामाला आहे. रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास ती वाशी येथून ऐरोली येथे जाण्यासाठी वाशी रेल्वे स्थानकात वाशी-ठाणे लोकलमध्ये बसली होती. या वेळी करिष्मा मोबाईलवरील मेसेज पाहत बसली असताना, लोकल सुटण्यापूर्वी अचानक आलेल्या एका चोराने करिष्माच्या हातातील किमती मोबाईल खेचून दुसऱ्या फलाटावर उडी टाकून पलायन केले. या प्रकारानंतर करिष्माने तत्काळ वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93324 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..