दुर्गम भागातील ११३ दात्यांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्गम भागातील ११३ दात्यांचे रक्तदान
दुर्गम भागातील ११३ दात्यांचे रक्तदान

दुर्गम भागातील ११३ दात्यांचे रक्तदान

sakal_logo
By

मुरबाड, ता. १७ (बातमीदार) : कच्छ युवक संघ, कल्याण शाखा यांच्या वतीने अँकरवाला रक्तदान अभियानांतर्गत अमृतमहोत्‍सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तालुक्याच्या दुर्गम भागातील ११३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
मुरबाड पंचायत समिती माजी उपसभापती सीमा घरत व अनिलभाऊ घरत यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळा, तळेगाव येथे हे रक्तदान शिबिर पार पडले. या कार्यक्रमासाठी भाजप तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, ठाणे जिल्हा सरचिटणीस नितीन मोहोपे, माजी सभापती दीपक पवार, गोविंद भला, सुरेश बांगर, काशिनाथ आबा झुंजारराव, रमेश उघडा, अनिल कवटे, चेतन घुडे, दिनेश भोईर व फॉरेस्ट कर्मचारी उपस्थित होते. सर्व रक्तदात्यांचे व तळेगाव ग्रामस्थांचे अनिल घरत यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93334 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..