सामूहिक राष्‍ट्रगीत गायन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामूहिक राष्‍ट्रगीत गायन
सामूहिक राष्‍ट्रगीत गायन

सामूहिक राष्‍ट्रगीत गायन

sakal_logo
By

सामूहिक राष्‍ट्रगीत गायनाने वातावरण भारले
मुंबई, ता. १७ ः शासनाने स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्सवांतर्गत ‘स्‍वराज्‍य महोत्‍सव’ आयोजित केला आहे. या अंतर्गत बुधवारी दुपारी ११ वाजता नागरिकांनी आहे त्‍या ठिकाणी उभे राहून सामूहिक राष्‍ट्रगीत गायनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मुंबई उपनगरांतील नागरिकांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिल्‍याचे पाहायला मिळाले. रस्‍त्‍यांवर, लोकलमध्‍ये, शाळा–महाविद्यालयांत सामूहिक राष्‍ट्रगान केले.

चाचणी परीक्षा असतानाही विद्यार्थ्यांचा सहभाग
घाटकोपर (बातमीदार) ः शासनाच्या आवाहनानंतर घाटकोपर पूर्व टेक्निकल हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत म्हटले. यामध्‍ये ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे आज मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळेचा चाचणी परीक्षेचा पेपर असतानाही राष्ट्रगीतासाठी विद्यार्थ्यांनी देशभक्ती भावनेने यात सहभाग घेतला. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद फाटक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सामूहिक राष्ट्रगीत गायना दरम्यान मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका फरिदा सनदे, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक सुशील जोशी आदी उपस्थित होते.

वडाळा पोलिसांची सलामी
वडाळा (बातमीदार) ः वडाळा पोलिस ठाणे येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रम प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी असे एकूण ५३ नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस निरीक्षक महेंद्र काळडोके, अशोक उगले यांनी मेहनत घेतली. त्‍याच प्रमाणे अँटॉप हिल वाहतूक वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सायन कोळीवाडा ट्रॅफिक सिग्नल येथे राष्ट्रगीत गाऊन सलामी दिली. या वेळी रस्त्यावरून ये-जा करणारे प्रवासीही या राष्‍ट्रगीत गायनात सहभागी झाले होते.

मुलुंडमध्येही सामूहिक राष्ट्रगीत गायन
चेंबूर (बातमीदार) ः मुंबई पोलिसांच्या परिमंडळ सातचे डीसीपी प्रशांत कदम यांच्या नेतृत्वाखाली मुलुंडमध्ये सामूहिक राष्ट्रगीत म्हटले गेले. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुलुंड पोलिस ठाण्यासमोर पोलिस, स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संस्था यांनी एकत्र येत राष्ट्रगीत म्हटले. या वेळी रस्त्यावरून जाणारी वाहने थांबून या उपक्रमात सहभागी झाली. नागरिकांनी दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल डीसीपी प्रशांत कदम यांनी नागरिकांचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93349 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..