जेएनपीएविरोधात आंदोलनाची हाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेएनपीएविरोधात आंदोलनाची हाक
जेएनपीएविरोधात आंदोलनाची हाक

जेएनपीएविरोधात आंदोलनाची हाक

sakal_logo
By

उरण, ता. १७ (वार्ताहर) ः जेएनपीएने खासगीकरण करून ३० वर्षांसाठी चालविण्यासाठी दिलेल्या न्हावा-शेवा कंटेनर टर्मिनलमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना व स्थानिकांना डावलून परस्पर परप्रांतीय कामगारांची भरती सुरू केली आहे. त्यामुळे या कामगार भरतीमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला असून ही प्रक्रिया तत्काळ बंद करण्याची मागणी जेएनपीटी वर्कर्स युनियनने केली आहे.
जेएनपीएने आपल्या मालकीचे असलेले एकमेव कंटेनर टर्मिनल खासगीकरणातून मे. जे. एम. बक्षी कंपनीला ३० वर्षांसाठी दिले आहे. या कंपनीने कंटेनर टर्मिनलचा ताबा घेताच बंदराचे न्हावा-शेवा फ्री पोर्ट कंटेनर टर्मिनल, असे नामकरण केले आहे. जेएनपीएने आपले उरलेले एकमेव कंटेनर टर्मिनल पीपीपी तत्त्वावर चालविण्यास दिले आहे. त्यामुळे जेएनपीएकडे स्वतःच्या मालकीचे आता कुठलेही कंटेनर टर्मिनल उरलेले नाही. त्यामुळे ज्या प्रकल्पग्रस्तांनी जेएनपीए बंदरासाठी शेत-जमीन, समुद्र किनारा दिला आहे; अशा स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीची संधी थेट जेएनपीएमध्ये मिळणे जवळपास बंद झाले आहे. जे. एम. बक्षी कंपनीला जेएनपीएने पीपीपी तत्त्वावर कंटेनर टर्मिनल चालविण्यास दिले आहे, त्यांनी न्हावा-शेवा फ्री पोर्ट कंटेनर टर्मिनलमध्ये प्रकल्पग्रस्तांना डावलून परस्पर परप्रांतीय कामगारांची खुलेआम भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये फसवणूक झाल्याची भावना आहे.
-----------------------------------------------
करारातील तरतुदींचा भंग
जेएनपीएने याआधीही खासगीकरण करताना विविध कंपन्यांशी केलेल्या करारामध्ये कामगार भरती स्थानिक प्रकल्पग्रस्तांमधूनच करावी, अशी तरतूद केली होती. या कंटेनर टर्मिनलच्या खासगीकरण प्रक्रियेतही जुन्या कराराप्रमाणे तरतूद आहे. मात्र तरीही स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून न्हावा-शेवा फ्री पोर्ट कंटेनर टर्मिनलमध्ये परस्पर परप्रांतीय कामगारांची भरती सुरू केली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष आहे.
----------------------------------
या गंभीर प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून मे. जे. एम. बक्षी कंपनीला त्यांनी चालवलेली थेट कामगार भरती प्रक्रिया ताबडतोब बंद करून कामगार भरती फक्त जेएनपीए प्रकल्पग्रस्तांमधूनच करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा जेएनपीए विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल.
- रवींद्र पाटील, सरचिटणीस, जेएनपीटी वर्कर्स युनियन

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93357 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..