जव्हारमध्ये वीज बिल वाटपात अनियमितता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हारमध्ये वीज बिल वाटपात अनियमितता
जव्हारमध्ये वीज बिल वाटपात अनियमितता

जव्हारमध्ये वीज बिल वाटपात अनियमितता

sakal_logo
By

जव्हार, ता. १७ (बातमीदार) : जव्हार शहरात महावितरणकडून वाटप होत असलेल्या वीजबिलास विलंब होत असल्याने ग्राहकांना विनाकारण अधिकचे शुल्क भरावे लागत आहे. शहरातील यशवंतनगर परिसरात बुधवारी वीजबिल भरणा मुदत १७ ऑगस्ट रोजी असताना त्याच दिवशी वीजबिल वाटप झाले. त्यामुळे ग्राहकांना अधिकचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
राज्य वीज नियामक आयोगाने इंधन समायोजन आकारात वाढ केली आहे. याचा परिणाम विद्युत देयकांवर होत आहेत. तालुक्यात २५ ते ३० हजार कुटुंबीयांसह व्यावसायिकांना महावितरण विद्युतपुरवठा करते. त्यातच, जव्हारमध्ये महावितरणकडून मीटरचे रीडिंग घेऊन बिले वाटप करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीच्या ढिसाळ कारभारामुळे ग्राहकांना अधिकचा भुर्दंड बसत आहे.

वीजबिल वाटप आणि रीडिंग घेणाऱ्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन बिले वेळेत वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे वेळेत बिलांचे वाटप केले जाईल.
- विवेक तळणीकर, उपअभियंता महावितरण, जव्हार

सकाळी वीजबिल मिळाले. त्यात वीजबिल भरण्याची सवलत दिलेली तारीख पाहिली तर १७ ऑगस्ट होती. शनिवार १३ ते १६ ऑगस्टपर्यंत बँकांना सुट्टी होती. त्यामुळे ग्राहकांना विलंब शुल्कासह बिलाचा भरणा करावा लागला.
- विशाखा अहिरे, सभापती, महिला व बालकल्याण समिती, जव्हार नगर परिषद

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93363 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..