चेरवलीतील सिद्धेश्वराचे मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चेरवलीतील सिद्धेश्वराचे मंदिर
चेरवलीतील सिद्धेश्वराचे मंदिर

चेरवलीतील सिद्धेश्वराचे मंदिर

sakal_logo
By

शहापूर तालुक्यातील किन्हवलीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर चेरवली गावाच्या हद्दीत सिद्धेश्वराचे मंदिर आहे. कानवी नदीच्या दक्षिण तटावर सन १९५७-५९ दरम्यान सुंदर, आखीव रेखीव दगडी कोरीव चिरे वापरून हे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराच्या दर्शनी भिंतीवर पूर्वेस जय-विजय यांच्या सुबक मूर्ती कोरून बसविण्यात आल्या असून समोर नंदी, मंदिरामध्ये पश्चिमेस दुर्गा, दक्षिणेला गणेशमूर्ती स्थापना केल्या आहेत.

महंत योगी किसननाथ बाबा यांनी १९८९-९० या काळात या जीर्ण मंदिराचे दुरुस्ती काम केले. भक्तांसाठी जागा अपुरी पडत असल्याने कर्मयोगी बालकनाथ यांनी २००७-०८ या वर्षी मंदिराचा जीर्णोद्धार केला. चेरवली गावच्या हद्दीत असलेल्या या सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात मोठा सभामंडप असून धार्मिक कार्यक्रमासाठी प्रशस्त दालन तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी लग्नसमारंभ, मंगलकार्य, दशक्रिया विधी व इतर विधी योग्य प्रकारे करण्यात येतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी येथे शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी दूर दूरवरून भक्तगण येतात. दररोजच्या हरिपाठ व आरतीसाठी अनेक वारकरी सहभागी होतात.

पर्यटन विकास विभागाकडून मंदिराचे सुशोभीकरण, दर्शनीय कमान, घाटाचे सुशोभीकरण, अद्ययावत शौचालये, रस्ते, स्वच्छतागृह, पार्किंग इत्यादी कामे प्रगतिपथावर आहेत.

मंदिरात कसे जाल?
- शहापूरहून किन्हवलीकडे जाणाऱ्या राज्य महामंडळाच्या बस किंवा अन्य वाहनाने चेरवली फाट्यावर उतरून साधारण शंभर मीटर अंतर चालावे लागते.

- किन्हवली मुख्य बाजारपेठेपासून हे ठिकाण दोन किलोमीटर अंतरावर आहे. येथून मुरबाड व शहापूरकडे जाणारी खासगी वाहने उपलब्ध असतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93365 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..