गणपती पाडा येथे विवाहितेची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपती पाडा येथे विवाहितेची आत्महत्या
गणपती पाडा येथे विवाहितेची आत्महत्या

गणपती पाडा येथे विवाहितेची आत्महत्या

sakal_logo
By

कळवा, ता. १७ (बातमीदार) : कळवा गणपती पाडा येथे प्रगती रहिवासी मंडळाच्या चाळ क्रमांक १८ मध्ये ३२ वर्षीय विवाहितेने बुधवारी पहाटे चार वाजण्‍याच्‍या सुमारास राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वनिता कबाडी असे तिचे नाव आहे.
वनिता ही पती किरण व दोन मुलांसह राहत होती. तिचे पती मुकुंद कंपनीमध्ये कामाला असून, ते रात्री कामावर गेल्यावर अज्ञात कारणावरून तिने पहाटे चार वाजता मुले झोपेत असताना घरी छताला गळफास लावून आत्महत्या केली. या संदर्भात कळवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, कळवा पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93370 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..