मातीच्या रंगीत पणत्यातून कलाकाराने साकारली बाप्पाची कलाकृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मातीच्या रंगीत पणत्यातून कलाकाराने साकारली बाप्पाची कलाकृती
मातीच्या रंगीत पणत्यातून कलाकाराने साकारली बाप्पाची कलाकृती

मातीच्या रंगीत पणत्यातून कलाकाराने साकारली बाप्पाची कलाकृती

sakal_logo
By

मातीच्या पणत्यांतून ५० फूट लांब गणेश प्रतिमा!
पवईमधील कलाकार चेतन राऊत यांची विक्रमी कलाकृती

घाटकोपर, ता. १७ (बातमीदार) ः कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव पूर्वीच्याच उत्साहात साजरा होणार असल्याने बाप्पाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज झाले आहेत. पवईमधील कलाकार चेतन राऊत यांनी यंदा ७५ हजार मातीच्या रंगीत पणत्यांपासून गणेशाची ५० फूट लांब आणि ४० फूट रुंद प्रतिमा साकारून विक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्या कलाकृतीची दखल विश्वविक्रमासाठी घेण्यात आली असून पवई आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सिनेमा ग्राऊंडमध्ये कलाप्रेमींना ती २० ऑगस्टपर्यंत पाहता येणार आहे.

गणेशाचे भव्य पोर्ट्रेट साकारण्यासाठी राऊत यांना दोन दिवस लागले. त्यासाठी बारा सहकाऱ्यांची मदत त्यांना झाली. सहा रंगांच्या छटा असलेले दिवे त्यासाठी वापरण्यात आले, असे राऊत यांनी सांगितले. पवईमधील समाजसेवक चंदन चित्तरंजन शर्मा यांच्या प्रयत्नाने पोर्ट्रेट साकारण्यात आले आहे.

चेतन राऊत यांनी आतापर्यंत अनेक प्रकारच्या कलाकृती साकारल्या आहेत. त्यांनी सध्या तयार केलेली गणेशाची प्रतिमा १५ वी आहे. दिव्यांपासून गणेशाचे साकारलेले भारतातील पहिले पोर्ट्रेट म्हणून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आदी विक्रमासाठी त्याची नोंद करण्यात येणार आहे, असे चेतन राऊत यांनी सांगितले.

मुंबई ः पवई आयआयटी मुख्य प्रवेशद्वारासमोर चेतन राऊत यांनी मातीच्या ७५ हजार दिव्यांपासून साकारलेली गणेशाची प्रतिमा. (छायाचित्र : नीलेश मोरे)

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93378 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..