ठाणेकर रंगले सामूहिक राष्ट्रगीतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणेकर रंगले सामूहिक राष्ट्रगीतात
ठाणेकर रंगले सामूहिक राष्ट्रगीतात

ठाणेकर रंगले सामूहिक राष्ट्रगीतात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १७ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत बुधवारी सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासह मुख्य बाजारपेठ, ठाणे महापालिका कार्यालय, ठाणे रेल्वेस्थानक परिसरात समूह गीताचा उपक्रम पार पडला. यावेळी नागरिकांकडूनही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी सर्वांनी आहे तिथे उभे राहून या उपक्रमात सहभागी व्हायचे अहे. याशिवाय जाणते अथवा अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये, केंद्र सरकार व राज्य सरकारशी संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग खोली किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बुधवारी सकाळी ११ वाजता ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत समूह राष्‍ट्रगीताला सुरुवात होताच खरेदीसाठी आलेल्या व रस्त्याने जात असलेल्या नागरिकांसह दुचाकी अथवा चारचाकीतून जाणाऱ्या वाहनचालकांनी जागेवर गाडी थांबवून समूह राष्‍ट्रगीतात सहभाग घेतला.
अधिकाऱ्यांचाही सहभाग
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेसी, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, तहसीलदार राजाराम तवटे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहातही समूह राष्‍ट्रगीताचे गायन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त जी. जी. गोदेपुरे, उप आयुक्त वर्षा दीक्षित यांच्यासह महापालिकेचे इतर वरिष्ठ अधिकारी, तसेच महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93385 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..